इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातक चूक केली आहे असा दावा केला आहे. बुधवारी (5 फेब्रुवारी) पाकव्याप्त काश्मीरच्या मुझफ्फराबाद येथील विधिमंडळात बोलत असताना त्यांनी हे विधान केलं आहे. तसेच नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीमध्ये पाकिस्तानचा वापर बळीच्या बकऱ्यासारखा केला असल्याचा आरोपही इम्रान खान यांनी केला आहे.
'पंतप्रधान मोदी यांनी घातक चूक केली आहे. त्यापासून आता मागे हटता येणार नाही. त्यांनी भारताला जेथे नेले आहे तेथून मागे जाणे शक्य नाही. हिंदू राष्ट्रवादाचे भूत बाटलीतून बाहेर आले असून, त्याला मागे घेता येणार नाही' असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे. तसेच 'या घडामोडींच्या साखळीतून अखेर काश्मीर स्वतंत्र होणार आहे' असा दावाही त्यांनी केला आहे. 'मोदी यांनी 5 ऑगस्टला केलेल्या कृतीनंतर काश्मीर स्वतंत्र होईल हा माझा विश्वास आहे. हा निर्णय त्यांनी घेतला नसता, तर हा मुद्दा त्यांना जगासमोर अधोरेखित करता आला नसता. त्याबद्दल जगाला सांगणे हे आपली जबाबदारी असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
चीनमध्ये कोरोना व्हायरसने आतापर्यंत 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. प्रत्येक दिवशी हा मृत्यूचा आकडा वाढतच चालला आहे. भारतानेसुद्धा वुहानमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी विशेष विमान पाठवून त्यांना परत आणलं. परंतु पाकिस्तानमधले हजारो विद्यार्थी वुहानमध्येच अडकून पडले आहेत. त्या विद्यार्थ्यांनी पाकिस्तान सरकारकडे मदत मागितली आहे. परंतु पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांना परत आणण्यास नकार दिला आहे. त्यानंतर सोशल मीडियावरून इम्रान खान यांच्यावर टीकेची झोड उडवली जात आहे.
चीनकडून त्या विद्यार्थ्यांना चांगली वैद्यकीय सुविधा मिळत असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानातील त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी इम्रान खान यांच्यावर त्यांना परत आणण्यासाठी दबाव वाढवला आहे. परंतु सरकार त्यांचं ऐकण्यात तयार नाही. त्यांना तिकडून इथे आणणं हे जोखमीचं काम आहे, असा दावा पाकिस्तान सरकारनं केला आहे. एका पाकिस्तानी विद्यार्थ्यानं सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं की, आम्ही अनेक तास स्वतःला खोलीमध्ये बंद करून घेत आहोत.
पाकिस्तानचे राष्ट्रपती झाले ट्रोल
पाकिस्तानचे राष्ट्रपती डॉक्टर आरिफ अल्वी विद्यार्थ्यांना अजब सल्ला दिल्यानं ट्रोल झाले आहेत. डॉक्टर आरिफ अल्वी म्हणाले, जर हा रोग आणखी पसरलेला आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी आहे तिकडेच राहिलं पाहिजे.
महत्त्वाच्या बातम्या
'श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र' ट्रस्टला मिळालं पहिलं दान, मोदी सरकारनं दिला एक रूपया!
विचित्र अपघात; रनवेवर उतरताना विमानाचे तीन तुकडे झाले
महिला अत्याचारविरोधी कठोर कायदा राज्यातही; आंध्रच्या ‘दिशा’चे अनुकरण
कर्जमाफीचा ३४ लाख शेतकऱ्यांना फायदा; लाभार्थींची नावे जाहीर करणार