शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

भारतातही आहेत इम्रान खानची मुलं; रेहम खानचा अनैतिक संबंधांचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 18:52 IST

पाकिस्तानमधील राजकीय पक्ष पीटीआयचा प्रमुख आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खानची घटस्फोटित पत्नी रेहम हिने त्याच्याबद्दल खळबळजनक वक्तव्य केले आहे.

नवी दिल्ली : पाकिस्तानमधील राजकीय पक्ष पीटीआयचा प्रमुख आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खानची घटस्फोटित पत्नी रेहम हिने त्याच्याबद्दल खळबळजनक वक्तव्य केले आहे. रेहमने आताच प्रकाशित केलेल्या आत्मचरित्रात इम्रान खानचा रंगेलपणा आणि व्यसन यावर बोलताना असा दावा केला आहे की, इम्रान खान याला अनैतिक संबंधातून काही भारतीय मुलेही आहेत. तसेच, त्याला ड्रग्ज घेण्याची सवय लागली आहे. 

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, रेहमने असा दावा केला आहे की, इम्रान खानचे आयुष्य सेक्स, ड्रग्ज आणि रॉक अॅण्ड रोलने भरले आहे. पाकिस्तानमध्ये सध्या आगामी निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. इमरान खान पाकिस्तानचे पंतप्रधान होण्यास इच्छुक आहेत. त्यातच रेहमने हे पुस्तक प्रकाशित करुन खळबळ उडवून दिली आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून रेहमने केलेल्या आरोपामुळे आगामी निवडणुकीत इम्रान खान याला फटका बसण्याची शक्यता आहे. विरोधी पक्ष नक्कीच हा मुद्दा उचलून धरतील.  

रेहमच्या आत्मचरित्र असलेल्या या पुस्तकाची विक्री गुरुवारपासून ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉनवर होत आहे. या पुस्तकात रेहम हिने म्हटले आहे की, इम्रान खान कुराणाचे पठण करत नाही. काळ्या जादूवर विश्वास ठेवतो. तसेच, अनैतिक संबंधातून भारतीय मुलेही असल्याचे त्याने स्वत: मान्य केले आहे. रेहमने यापूर्वीही पुस्तकाच्या माध्यमातून इम्रान खानबाबत गंभीर आरोप केले आहेत. इम्रान खान गे आहे. त्याने तिला त्याच्या मित्रांबरोबर संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला होता. लग्नापूर्वी इम्रान खाने तिचा छळ केला होता, असेही रेहमने म्हटले होते. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खान