शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

Imran Khan, Farah Khan: पाकिस्तान कंगाल, इम्रान खान बेहाल; पण लाडकी मेहुणी झाली मालामाल, एवढी संपत्ती वाढली की...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2022 2:18 PM

Farah Khan Property, Wealth: विरोधकांसोबतच इम्रान खानच्या जवळचे लोकही फराह खानवर प्रश्न उपस्थित करत आहेत. अलीम खान यांनी फराहवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले आहेत.

पाकिस्तानातील राजकीय संकटामुळे पंतप्रधान इम्रान खान यांची सत्ता गेलेली असताना त्यांची काळी जादू करणारी बायको आणि लाडकी मेहुणी यांची मात्र जगभरात चर्चा आहे. रहस्यमयी पत्नी पत्नी बुशरा बीबीची खास मैत्रिण फराह खानची संपत्ती इम्रान खान यांच्या कार्यकाळात चौपट वेगाने वाढली आहे. आता या फराह खानने पाकिस्तानही सोडले आहे. 

२०१७ मध्ये फराह खानने आपली संपत्ती 23 करोड़ 16 लाख पाकिस्तानी रुपए सांगितली होती. जी 2021 मध्ये वाढून 97 करोड़ 10 लाख पाकिस्तानी रुपए एवढी वाढली आहे. अद्याप २०२२ ची संपत्ती बाहेर यायची आहे. फराह खान ही पाकिस्तानात आणखी दोन नावांनी वावरते. फरहत शहजादी आणि फराह गुज्जर या नावानेही ती ओळखली जाते. 

विरोधकांसोबतच इम्रान खानच्या जवळचे लोकही फराह खानवर प्रश्न उपस्थित करत आहेत. अलीम खान यांनी फराहवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले आहेत. फराह खानला पंजाब प्रांतात प्रत्येक नियुक्ती आणि बदलीसाठी लाखो रुपये मिळत होते. फराहने अनेक शहरांमध्ये अनेक मालमत्ता खरेदी केल्या असून अनेक व्यावसायिक क्षेत्रात लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे, असा आरोप त्यांनी केला होता. 

लाहोर आणि इस्लामाबादमध्ये मालमत्ता खरेदी कागदपत्रांनुसार, फराह खानने 2019 मध्ये कर माफी योजनेचा फायदा घेऊन काळा पैसा पांढरा केला आणि योजनेअंतर्गत 328 दशलक्ष (32 कोटी 80 लाख) रुपयांची मालमत्ता घोषित केली. फराह खानने लाहोर आणि इस्लामाबादमध्ये आलिशान मालमत्ता खरेदी केल्याचेही म्हटले आहे. त्यात इस्लामाबादच्या आलिशान परिसरात बांधलेल्या व्हिलाचाही समावेश आहे. पाकिस्तानबाहेर UAE मध्ये फ्लॅट घेतला. त्याची किंमत 1 कोटी 57 लाख 49 हजार 479 रुपये होती.फराह खानने इस्लामाबादच्या सेक्टर F-7/2 मध्ये 933 स्क्वेअर यार्डचे घर दाखवले आहे, जे तिने 195 मिलियन (19 कोटी 50 लाख) मध्ये खरेदी केले आहे. 2018 मध्ये तिने कर भरला नाही. पण उस्मान बुजदार पाकिस्तानी पंजाबचे मुख्यमंत्री झाल्यानंतर वर्षभरातच फराह खानच्या संपत्तीत झपाट्याने वाढ झाली. तिच्या पतीने आधीच पाकिस्तान सोडले होते. यानंतर तिने ३ एप्रिलला पाकिस्तान सोडले आहे. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान