इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर शनिवारी अटक करण्यात आली. सत्तेत असताना महागड्या सरकारी भेटवस्तू विकल्याचा त्यांच्यावर आरोप होता. या निर्णयानंतर खान यांना ५ वर्षे निवडणूक लढविता येणार नाही.
इस्लामाबाद येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश हुमायून दिलावर यांनी त्यांना एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला. दंड न भरल्यास त्यांना आणखी सहा महिने तुरुंगात ठेवण्यात येईल, असे न्यायाधीशांनी सांगितले.‘पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ’चे अध्यक्ष यांच्यावरील संपत्तीची खोटी माहिती दिल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. त्यांनी निवडणूक आयोगाला जाणूनबुजून बनावट तपशील (तोशखाना भेटवस्तू) सादर केला. भ्रष्टाचार प्रकरणात ते दोषी आढळले आहेत,” असे न्यायालय म्हणाले.
वस्तू विकून २० कोटी कमावलेnतोशखाना हा एक विभाग आहे; जेथे राज्यकर्ते व सरकारी अधिकाऱ्यांना इतर सरकारप्रमुख व परदेशी मान्यवरांनी दिलेल्या भेटवस्तू ठेवल्या जातात. nखान यांनी अनेक महागड्या भेटवस्तू खरेदी करून नफा मिळविण्यासाठी त्या विकल्याचा आराेप हाेता. nतोशखानातील वस्तू २.५ कोटी रुपयांत खरेदी केली होती आणि ५.८ कोटी रुपयांत विक्री केल्याचे इम्रान खान यांनी आयोगाला सांगितले होते.nप्रत्यक्षात मात्र त्यांना २० कोटींपेक्षा जास्त नफा झाल्याचे आढळले.
हेलिकॉप्टरने हलवलेपंजाबचे माहिती मंत्री अमीर मीर यांनी एका निवेदनात सांगितले की, पोलिस इम्रान खान यांना इस्लामाबादला घेऊन जात आहेत. त्यांना हेलिकॉप्टरने इस्लामाबादला नेले जात आहे. प्रतिकाराविना अटकखान यांना शनिवारी ताब्यात घेताना पोलिसांना कोणत्याही मोठ्या प्रतिकाराला सामोरे जावे लागले नाही. १५० हून अधिक खटले खान यांच्यावर दाखल करण्यात आले आहेत. यांत भ्रष्टाचार, दहशतवाद आणि हिंसक निदर्शने आणि लोकांना हिंसाचारासाठी प्रवृत्त करणे अशा अनेक आरोपांचा समावेश आहे. पत्नीचीही चाैकशीया प्रकरणी इम्रान यांच्या पत्नी बुशरा बीबी यांच्यावरही आराेप आहेत. त्यांचीही चाैकशी हाेणार आहे. आतापर्यंत त्यांना १३ वेळा तपास संस्थांनी नाेटीस दिली हाेती. मात्र, त्या एकदाही हजर झाल्या नाहीत.