वॉशिंग्टन : येत्या ३० वर्षांत १०० वर्षांवरील अमेरिकन लोकांची संख्या चौपट होण्याची शक्यता आहे. अमेरिकेत सर्वाधिक वेगाने हा गट वाढत आहे. १९७०पासून त्यांची संख्या अंदाजे १० वर्षांनी दुप्पट होत आहे. स्वीडनच्या करोलिंस्का इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनी विविध बायोमार्कर्सचे परीक्षण करून रहस्य शोधले आहे.
यूरिक ॲसिड मोठे कारणजे १०० वर्षांपर्यंत जगले त्यांच्यामध्ये ६० वर्षे वयात ग्लुकोज, क्रिएटीनीन व यूरिक ॲसिडची पातळी कमी होऊ लागली होती. यूरिक ॲसिडचे प्रमाण सर्वाधिक कमी असलेल्याला १०० वर्षे जगण्याची शक्यता अधिक होती.
तुलनेत महिलांची शंभरी कुठे? शंभरी पूर्ण केलेल्या एकूण अमेरिकन नागरिकांची संख्या सध्या केवळ ०.०३ टक्के आहे. २०५४पर्यंत ही संख्या ०.१ टक्केपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकेत पुरुषांच्या तुलनेत महिला अधिक प्रमाणात शंभरी गाठत आहेत. भविष्यातही हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
३० वर्षांत प्रचंड बदलजगातील अंदाजे ७,२२,०० लोक शतायुषी आहेत. २०२४ मध्ये सर्वाधिक शतायुषी झालेले लोक जपान, अमेरिका, चीन, भारत आणि थायलंडमध्ये आहेत.जपानमध्ये प्रत्येक १० हजार लोकांमागे अंदाजे १२ लोक शंभरी पूर्ण केलेली आहेत. थायलंडमध्ये १० हजार लोकांमध्ये ५ आणि अमेरिकेत ३ लोक शंभरी पार केलेले आहेत. याच्या तुलनेत चीन आणि भारतामध्ये शंभरी पार केलेले १० हजारांमागे १ पेक्षाही कमी आहेत. कारण सध्या येथे बहुसंख्य लोकसंख्या तरुण आहे. पुढील ३० वर्षांत चीनमध्ये शंभरी पार केलेल्या लोकांची संख्या जगात सर्वाधिक असेल. यानंतर अमेरिका, भारत, जपान आणि थायलंड यांचा क्रमांक असेल.