वॉशिंग्टन : जन्माद्वारे नागरिकत्व बहाल करण्याचा अधिकार केवळ कार्यकारी आदेशाने हिसकून घेता येणार नाही, असे परखड मत अमेरिकन प्रतिनिधीगृहाचे सभापती पॉल रायन यांनी व्यक्त केले आहे. यासंदर्भात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी विधान केले होते. त्यावर रायन यांनी जोरदार टीका केली आहे.आई-वडिलांकडे नागरिकत्व नसतानासुद्धा जन्म अमेरिकेत झाल्यास, त्या बाळाला अमेरिकेचे नागरिकत्व मिळते. हा कायदा हास्यास्पद आहे, असे ट्रम्प यांनी एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत मंगळवारी म्हटले होते. या विधानावर अमेरिकेत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
नागरिकत्व अधिकारांबाबत ट्रम्पविरोधात वाढती नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2018 4:38 AM