नवी दिल्ली - जगभरातील सीमारेषेवरील परिस्थितीमुळे भारत आणि अमेरिका चिंताग्रस्त असतानाच आता चीनचं स्पाय जहाँज श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरावर सोमवारी पोहोचले आहे. 16 ते 22 ऑगस्ट असे एक आठवडा हे जहाँज या बंदरावर राहणार आहे. भारताने चिंता व्यक्त केल्यामुळे श्रीलंकेनं चीनी जहाँजाला येथील बंदरावर येण्यास परवानगी दिली नव्हती. मात्र, शनिवारी अचानक श्रीलंकेकडून चीनी जहाँजाला येण्यास परवानगी देण्यात आली.
सध्या भीषण आर्थिक परिस्थितीचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत हे चीनी जहाँज 11 ऑगस्ट रोजी पोहोचणार होते. मात्र, श्रीलंकेनेन या जहाँजाला येण्यापूर्वीच अचानक थांबण्याचे सांगितले. त्यामुळे, चीनने नाराजी दर्शवत हा अचानक झालेला विरोध अनुचित प्रकार असल्याचे म्हटले. तसेच, काही देशांचा श्रीलंकेव दबाव असून कोलंबोवर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न आहे. या देशांकडून तथाकथिकपणे सुरक्षेचा हवाला देऊन हा दबाव टाकण्याचा आल्याचंही चीनने म्हटले होते. कोलंबोच्या अंतर्गत प्रकरणात दखल देणे हे चुकीचं आहे, असेही चायनाने म्हटले होते. चीनचा रोख, पूर्णपणे भारताकडे होता. मात्र, त्यांनी देशाचं नाव घेतलं नाही.
चीनच्या या विधानानंतर श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी चीनला सुनावले होते. श्रीलंका एक स्वयंपूर्ण देश असून आपले निर्णय स्वत: घेतो. बागची यांनी पुढे बोलताना म्हटले की, आम्ही नेहमीच विकासाच्या संदर्भाने भारत आणि चीन या देशांसोबत संवेदना, मैत्री आणि परस्पर हितसंबंध जपले आहेत.
स्पाय जहाँज असलेल्या चीनच्या या युद्धनौकेला इंधन भरण्यासाठी येथील बंदराचा आसरा घ्यावा लागला आहे. हंबनटोटा बंदरावर इंधन भरल्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात हिंद महासागरातील नॉर्थ-वेस्ट भागात या जहाँजाद्वारे सॅटेलाइट कंट्रोल आणि रिसर्च ट्रैकिंग करण्याची चीनची योजना आहे. दरम्यान, भारताला चीनच्या या हालचालीवर विश्वास नसल्याने भारताने श्रीलंकेला चीनचे जहाँज उतरविण्यास टाळण्याचे म्हटले होते. चीनच्या या हालचाली भारताच्या सुरक्षेला धोका असल्याचं भारताचं म्हणणं आहे. कोलंबोपासून हे बंदर केवळ 250 किमी अंतरावर आहे.