ऑनलाइन लोकमत
संयुक्त राष्ट्र, दि. 22 - संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक सामाजिक परिषदेचा कार्यक्रम व समन्वय उपसमितीवर भारताची एकहाती निवड करण्यात आली. भारतासोबत इतर १२ देशांनाही या समितीवर निवडण्यात आले.
भारताला ५० पैकी ४९ मते मिळाली असून, एशियाई समूहात सर्वाधिक मते मिळाली असल्याचे संयुक्त राष्ट्रामधील भारताचे स्थायी प्रतिनिधी सैयद अकबऊद्दीन यांनी सांगितले.
संयुक्त राष्ट्रामधील निवडणुकीत भारत पुन्हा अव्वल स्थायी राहील, असे ते म्हणाले. उपसमितींचे सदस्यत्व तीन वर्षांसाठी राहणार असून, जानेवारी २०१८ पासून कालावधी सुरू होणार आहे. या उपसमितीवर भारत व्यतिरिक्त बर्किना फासो, इराणा, जपान, पाकिस्तान, बेलरूस, बुल्गारिया, मालदिव, ब्राझिल, चिली, क्यूबा, ब्रिटेन व अमेरिका निवडून आले आहे.
भारतासह अन्य १९ देश इंटरनॅशनल नाटकोटिक्स कंट्रोल बोर्डसाठी निवडून आले. या मंडळाचा कार्यकाळ चार वर्षांचा असून, तो जानेवारी २०१८ पासून सुरू होणार आहे.