शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

संयुक्त राष्ट्रात चीनला मोठा धक्का! ECOSOCचा सदस्य बनला भारत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 10:06 AM

संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती यांनी याबाबत माहिती दिली.

भारताने पुन्हा एकदा चीनला धक्का दिला आहे. चीनला पराभूत करीत आर्थिक आणि सामाजिक परिषद (ECOSOC) संघटनेच्या संयुक्त राष्ट्रांच्या महिलांच्या स्थिती विषयक आयोगाचा सदस्य म्हणून भारत निवडला गेला आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती यांनी याबाबत माहिती दिली.टीएस तिरुमूर्ती म्हणाले की, प्रतिष्ठित ECOSOC संघटनेत भारताने जागा मिळवली आहे. भारताची महिलांच्या स्थिती आयोगाच्या (सीएसडब्ल्यू) सदस्यपदी निवड झाली आहे. आमच्या सर्व प्रयत्नांमध्ये लैंगिक समानता आणि महिला सबलीकरणास प्रोत्साहित करण्याच्या आमच्या बांधिलकीचे हे महत्त्वपूर्ण समर्थन आहे. आम्ही सदस्य देशांचे त्यांच्या समर्थनाबद्दल आभार मानतो. भारत, अफगाणिस्तान आणि चीनने महिलांच्या स्थिती आयोगासाठी निवडणूक लढविली होती.यामध्ये भारत आणि अफगाणिस्तानने 54 सदस्यांसह निवडणूक जिंकली, तर चीनला पराभवाचा सामना करावा लागला. चीनला निम्मी मतेही जमवता आली नाहीत. बीजिंग वर्ल्ड कॉन्फरन्स वूमन(1995)चे हे 25वे वर्षं आहे. यानिमित्ताने चीनला भारताकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्याचबरोबर भारत आता चार वर्ष या आयोगाचा सदस्य असेल. 2021 ते 2025 पर्यंत भारत महिलांच्या स्थितीविषयी संयुक्त राष्ट्र आयोगाचा सदस्य असेल.