शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

चीननं काढली २० हजार भारतीय विद्यार्थ्यांविरोधात खुन्नस, भारतानं दिलं जशास तसं उत्तर!; कठोर निर्णय घेत केलं चीतपट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 1:32 PM

Tit For Tat to China : भारताने चीनला आणखी एका आघाडीवर धडा शिकवला आहे. कोविडमुळे मायदेशी परतलेले २० हजार भारतीय विद्यार्थी पुन्हा चीनला अभ्यासासाठी जाण्याची वाट पाहत आहेत, मात्र चीन परवानगी देत ​​नाहीये. आता भारतानेही चिनी नागरिकांचे टुरिस्ट व्हिसा रद्द केले आहेत.

नवी दिल्ली-

चिनी नागरिक आता टुरिस्ट व्हिसावर भारतात येऊ शकणार नाहीत. जगभरातील एअरलाइन ऑपरेशन्सवर देखरेख ठेवणाऱ्या आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेने (IATA) दिलेल्या माहितीनुसार चीनी नागरिकांना जारी करण्यात आलेले भारतीय पर्यटक व्हिसा यापुढे वैध राहणार नाहीत. चिनी पर्यटकांना भारतात येण्यापासून रोखण्याच्या निर्णयाला भारताच्या बाजूने चीनला चोख प्रत्युत्तर म्हणून पाहिलं जात आहे. कोविड-19 महामारीमुळे भारतात परतलेल्या २० हजार भारतीय विद्यार्थ्यांना पुन्हा उर्वरित शिक्षण पूर्ण करण्यासाठी चीनमध्ये दाखल होण्यास टाळाटाळ केली जात आहे. उच्च सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भारत अजूनही चिनी लोकांना व्यवसाय, रोजगार, राजनैतिक आणि अधिकृत व्हिसा जारी करत आहे.

चीनमध्ये कोविड-19 महामारीच्या नव्या लाटेशी झुंज देत आहे. तरीही, थायलंड, पाकिस्तान आणि श्रीलंकेतील विद्यार्थ्यांना येण्याची परवानगी दिली आहे, परंतु भारतातील हजारो विद्यार्थी अद्याप बीजिंगच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी गेल्या महिन्यात भारत दौऱ्यावर आलेल्या चिनी समकक्ष वांग यी यांच्यासमोरही हा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, चीनने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. भारताने गेल्या महिन्यात १५६ देशांसाठी इलेक्ट्रॉनिक टूरिस्ट व्हिसाची सुविधा पुन्हा सुरू केली आहे. कोविडमुळे दोन वर्षांनंतर भारताने २७ मार्चपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू केली आहेत.

चीनबरोबरच ब्रिटन-कॅनडानेही बंदी घातलीभारताने ब्रिटन आणि कॅनडातील नागरिकांना ई-टुरिस्ट व्हिसावर भारतात येण्यापासून रोखले आहे. पण त्या देशांतील भारतीय मिशनने जारी केलेल्या नियमित कागदी व्हिसावर ते भारतात येऊ शकतात. ताज्या निर्णयानुसार, जपान आणि अमेरिका व्यतिरिक्त इतर कोणत्याही देशाच्या नागरिकांना दिलेला भारताचा पर्यटन व्हिसा यापुढे वैध राहणार नाही. भारतातील पर्यटक व्हिसाची वैधता १० वर्षांपर्यंत असते. जागतिक संस्था IATA वेळोवेळी अपडेट करत असते जेणेकरुन एअरलाइन्सना कळू शकेल की कोणत्या देशाच्या नागरिकांना कोणत्या देशात प्रवास करण्याची परवानगी आहे. १९ एप्रिल रोजी भारताविषयी नवे अपडेट जारी केले होते, ज्यामध्ये कोणत्या देशांचे नागरिक यापुढे ई-टुरिस्ट व्हिसावर भारतात जाऊ शकणार नाहीत याची माहिती देण्यात आली. 

भारताविषयीचा अहंकार चीन सोडेनाचीनसमोर भारत नतमस्तक होईल हा भ्रम चीन अजूनही सोडण्यास तयार नाही. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) गडबड निर्माण करण्याचा प्रयत्न वेळोवेळी फसलेला असतानाही चीन अजूनही भारताची भूमिका समजून घेऊ शकत नाही किंवा समजून घेऊ इच्छित नाही असंच दिसून येत आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या मुद्द्यावरून अमेरिकेसह सर्व बलाढ्य पाश्चिमात्य देशांसमोर भारतानं रोखठोक भूमिका मांडली. किमान हे पाहून तरी चीननं काही तरी शिकायला हवं. तरीही चीन म्हणतं की तुमच्या बुद्धीला कुलूप लावलं गेलं असेल तर तुम्हाला स्वतःच्या ताकदीचा अभिमान वाटत राहील, समोरच्या व्यक्तीची ताकद कधीच दिसणार नाही. पण चीनच्या बाबतीतही तेच लागू होतं.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत