India China Border: बिजिंग : कोरोनाच्या पहिल्या लाटेत (Corona Virus Pandemic) एकाबाजुने भारत जगासाठी धावून जात होता, तर दुसऱ्या बाजुने कोरोनाशी लढा देत होता. तेव्हा विश्वासघातकी चीननेलडाखच्या सीमेवर (India China Border Dispute) त्याचा फायदा उठविण्याचा प्रयत्न केला होता. गलवान घाटीत (Galwan Ghati) भारतीय जवानांवरील हल्ला परतवून लावल्याने बराच काळ तणाव निर्माण झाला होता. आता पुन्हा भारत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुरता घुसमटलेला असताना चीनने पूर्व लडाखमधील सीमेवर युद्धाची तयारी वेगवान केली आहे. (Ngari Tibet, 2nd Artillery Brigade under PLA Xinjiang Military District received PHL-03 12-tube 300mm long-range multiple rocket launchers.)
चीनने घातकी आणि लांब पल्ल्यावर मारा करू शकणारे अत्याधुनिक PHL-03 मल्टिपल रॉकेट लॉन्चर्स तिबेटच्या भारतीय सीमेजवळ तैनात केले आहेत. चीनच्या सरकारी टीव्ही चॅनेलने सीसीटीव्हीने याबाबतचे वृत्त दिले आहे. ही रॉकट लाँचर्स भारतीय सीमेवर तैनात असलेल्या शिंजियांग कमांडकडे सोपविण्यात आली आहेत.
सीसीटीव्हीच्या दाव्यानुसार हे रॉकेट ट्रकवरून नेता येऊ शकते. तसेच हे रॉकेट पूर्णपणे कॉम्प्युटर संचलित आहे. तसेच एकाचवेळी अनेक ठिकाणांना लक्ष्य करू शकते. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार ही रॉकेट लाँचर्स लडाख सीमेवर 5200 मीटर उंचीवर तैनात करण्यात आली आहेत. हा तोच भाग आहे जिथे गेल्या वर्षी गलवान हिंसा झाली होती.
हे रॉकेट लाँचर्स वेगाने तैनात केले जाऊ शकतता. तसेच प्रमुख भागांमध्ये कब्जाही करता येऊ शकतो. या रॉकेट लाँचर्समुळे चिनी सैनिक तिबेटच्या पठारी भागात, वाळवंटी भाग आणि प्रत्येक ऋतूमध्ये युद्ध लढू शकतात. या रॉकेट लाँचरमध्ये 12 ट्यूब आहेत, ज्यात 12 इंच कॅलिबरची बॅरल आहेत. प्रत्येक रॉकेटचे वजन हे 800 किलो आहे. या रॉकेटची मारकक्षमता ही 60 किमी प्रति तासाच्या वेगाने 130 किमीपर्यंत आहे.
विकृत चीन! भारतातील पेटत्या चितांवरून उडविली खिल्ली; कम्युनिस्ट पार्टीची जगभर नाचक्की
सीसीटीव्हीच्या दाव्यानुसार केवळ 3 मिनिटांत ही रॉकेट सिस्टिम युद्धासाठी तयार होते. ही सिस्टिम चीनच्या बाईदू सिस्टिमशी जोडण्यात आली आहे, त्यामुळे ही सिस्टिम योग्य निशाना साधू शकेल. याशिवाय चीनने लडाखमध्ये भारतीय जवानांना उत्तर देण्यासाठी खूप हलक्या वजनाचे 15 टँक, 155 मिमीच्या 181 तोफा आणि पर्वतरांगांमध्ये उड्डाण करू शकणारे ड्रोन तैनात केले आहेत. ही तयारी भारत कोरोना संकटात सापडलेला असताना चीन करू लागला आहे.