वाॅशिंग्टन : चीन आणि भारत यांच्यातील चर्चेला अमेरिकेने पाठिंबा दिला आहे. सीमावाद संपविण्यासाठी दोन्ही देशांत संवादाची गरज असल्याचे त्याचे म्हणणे आहे. तथापि, बीजिंग या चर्चांना गांभीर्याने घेत नाही, असे बायडेन प्रशासनाचे म्हणणे आहे. चीन-भारत सीमा वादावर आमची भूमिका जुनीच आहे, असे अमेरिकेच्या दक्षिण व मध्य आशियाई विभागाचे सहायक परराष्ट्र मंत्री डोनाल्ड लू यांनी सांगितले. चीन सरकार या चर्चांना प्रत्यक्षात गांभीर्याने घेत असल्याचे पुरावे नाहीत. जे दिसतेय ते याउलट आहे. आम्ही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनकडून सतत होणारा हस्तक्षेप पाहू शकतो, असे अमेरिकेने म्हटले आहे.
तत्काळ उत्तर द्याn लिसा कर्टिस यांनी एक अहवाल जारी केला होता. अमेरिका भारतासोबतचे संबंध आणखी सुधारता येतील याचा विचार करते. n तसेच अमेरिकेने बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे आणि भविष्यातील भारत-चीन सीमा संकटाला त्वरित प्रतिसाद देण्यासाठी तयार राहावे, असेही त्यांनी यात लिहिले होते.