बीजिंगः भारताच्या कठोर भूमिकेनंतर गलवान खो-यातून चिनी सैनिक तंबू काढून मागे फिरले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर चीनचे सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्समधून भारताला इशारा देण्यात आला आहे. लडाखच्या सीमावर्ती भागात भारताचे लढाऊ हेलिकॉप्टर अपाचे उड्डाण करत आहे. तसेच भारतानं टी- 90 टँक रणगाडेही तैनात केले आहेत. चीनचं सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्समधून भारताला थेट धमकी देण्यात आली आहे. जर भारताने कोणतीही आक्रमक कारवाई केली, तर आम्ही त्याला उत्तर देण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. पीएलएने भारताला प्रत्युत्तर देण्यासाठी तिबेटच्या उंच भागात अनेक अत्याधुनिक शस्त्रे आणि विमानं तैनात केल्याचंही ग्लोबल टाइम्समधून सांगण्यात आलं आहे.भारत लडाखच्या सीमावर्ती भागात सतत सैन्याची जमवाजमव करीत आहे आणि युद्धसराव करत असल्याचा आरोपही ग्लोबल टाइम्सने केला आहे. चिनी वृत्तपत्राने म्हटले आहे की, पीएलएने त्याच्या वायव्य सीमेवर अनेक रॉकेट लाँचर्स, तोफा, अँटी-टॅंक क्षेपणास्त्रे, विमानविरोधी बंदुका आणि अटॅक हेलिकॉप्टर तैनात केले आहेत. ग्लोबल टाइम्सने सांगितले की, ही शस्त्रे खास उंचावरील भागात लढाईसाठी तयार केली गेली आहेत. चिनी वृत्तपत्राने म्हटले आहे की, भारताने नुकतेच आपल्या आघाडीच्या मोर्चांवर अपाचे ही लढाऊ हेलिकॉप्टर तैनात केली आहेत. याव्यतिरिक्त भारताने गलवान खो-यात टी -टँक रणगाडेही तयार ठेवले आहेत.ग्लोबल टाइम्सने कथित लष्करी तज्ज्ञांचा हवाला देत म्हणलं आहे की, पीएलएनं उंच भागात लढाईसाठी खूप उपयुक्त अशी शस्त्रास्त्रं आणि लढाऊ हेलिकॉप्टर तयार ठेवली आहेत. भारतानं आक्रमक केल्या चिनी शस्त्रे भारताला नेस्तनाबूत करतील. ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे की, भारताशी असलेला तणाव कमी करण्याबाबत सहमती दर्शविली गेली असली तरी चिनी सैन्य भारताच्या कोणत्याही भडकाऊ कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी तयार आहे. गेल्या 3 आठवड्यांपासून पूर्व लडाखच्या सीमेवर तणावपूर्ण परिस्थितीनंतर चीनकडून शेवटी सकारात्मक पावले उचलली जात आहेत. लडाखच्या गलवान खो-यात 15 जूनला भारतीय आणि चिनी सैन्यांदरम्यान झालेल्या हिंसक चकमकीनंतर एकीकडे चिनी नेते शांततेबद्दल बोलत होते, दुसरीकडे चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) आपली शक्ती वाढवत भारताच्या हद्दीत घुसखोरी करत होती.चीनच्या सैन्याने 1.2 किमी घेतली माघारआता दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमधील चर्चेनंतर चिनी सैनिकांनीही माघार घेतल्याचे उपग्रहाच्या ताज्या छायाचित्रांमधून दिसत आहे. अमेरिकेची अंतराळ तंत्रज्ञान कंपनी मॅक्सरने उपग्रहाच्या माध्यमातून गलवान खोऱ्यातील ताजे फोटो टिपले असून, ते सार्वजनिक केले आहेत. ओपन सोर्स इंटेलिजन्स विश्लेषक डेटरेस्फा यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. भारत आणि चीनमधील वाटाघाटीनंतर यावर सहमती झाली. सॅटेलाइट फोटोंच्या आधारे असे म्हणता येईल की, चीनचा ताफा 1.2 किमीने मागे गेला आहे.
हेही वाचा
SBIचं कोट्यवधी ग्राहकांना मोठं गिफ्ट! 14व्यांदा घटवले व्याजदर, आता EMI होणार कमी
भारतीय अर्थव्यवस्थेच्या घसरणीवर रघुराम राजन म्हणतात...
STFने आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या विकास दुबेचा उजवा हात असलेल्या अमर दुबेला केले ठार
मुलांच्या उज्ज्वल 'भविष्या'साठी 'या' बँकेनं सुरू केले नवे खाते, मिळणार भरपूर फायदे