बीजिंग: पूर्व लडाखमध्ये तणाव वाढवणारा चीन भारताविरोधात मोठी रणनीती आखताना दिसत आहे. नेपाळला अप्रत्यक्षपणे पाठिंबा देत भारताविरोधात भडकावल्यानंतर आता चीन नवी चाल खेळण्याच्या प्रयत्नात आहे. भूतानसोबत पूर्व भागात सीमावाद असल्याची कबुली पहिल्यांदाच अधिकृतपणे चीनकडून देण्यात आली आहे. चीननं दिलेली कबुली भारतासाठी महत्त्वाची आहे.भूतानची पूर्वेकडील सीमा अरुणाचल प्रदेशला लागून आहे. याच भागात सीमावाद असल्याचा दावा चीननं केला आहे. भूतानसोबतचा सीमावाद कधीच संपुष्टात आला नव्हता, अशी भूमिका चीननं घेतली आहे. 'पूर्व, मध्य आणि पश्चिमेकडील भागांत भुतानसोबत बऱ्याच कालावधीपासून सीमावाद सुरू झाला. यामध्ये कोणत्याही तिसऱ्या देशानं हस्तक्षेप करू नये,' असं म्हणत चीननं अप्रत्यक्षपणे भारताला इशारा दिला आहे. 'हिंदुस्तान टाईम्स'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.भूतानसोबत १९८४ ते २०१६ या कालावधीत आतापर्यंत २४ वेळा बैठका झाल्या. त्यात केवळ पश्चिम आणि मध्य क्षेत्रातील वादावर चर्चा झाल्याचा चीनचा दावा आहे. चीनसोबत याआधी कधीही पूर्व भागात सीमावादावर चर्चा झाली नसल्याची माहिती भूतानमधील सूत्रांनी दिली. 'दोन्ही देशांनी मध्य आणि पश्चिमेकडील सीमावाद मान्य केला होता. हा वाद सोडवण्यासाठी सहमतीदेखील झाली होती. चीनला पूर्वेतील जमीनदेखील त्यांची वाटत होती, तर मग त्यांनी हा विषय आधीच उपस्थित करायला हवा होता,' असा मुद्दा भूतानकडून मांडला जात आहे.पूर्वेकडील सीमावाद उकरून काढणं हा चीनचा नवा डाव असल्याचं भूतानमधील तज्ज्ञांनी सांगितलं. 'दोन्ही देशांनी सीमावादाबद्दलच्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यात केवळ पश्चिम आणि मध्य भागातील सीमांचा उल्लेख आहे,' अशी माहिती तज्ज्ञांनी दिली. चीनच्या या नव्या दाव्यावर भारतानं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र! आणखी एक देश भारतासोबत येणार; लवकरच 'गुप्त करार' करणारआणखी एक दणका! आता मेट्रो प्रकल्पातून 'चिनी कम'; ड्रॅगनला जोरदार धक्कावाढत्या एकीनं चीन एकाकी; भारताला 'या' पाच बलाढ्य देशांचा पाठिंबा
India China FaceOff: 'ती' सीमादेखील वादग्रस्त असल्याचा ड्रॅगनचा दावा; भारताविरोधात नवा कावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2020 4:03 PM