लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषे(LAC)वर भारत आणि चीनमध्ये तणाव कायम आहे. दरम्यान, चीनचा आणखी एक वाईट हेतू उघडकीस आला आहे. चीन डोकलाम आणि नाथू ला येथे क्षेपणास्त्र साइट्स बनवित आहे, असं काही उपग्रह प्रतिमांच्या माध्यमातून समोर आलं आहे. भारत आणि चीनमधील लष्करी संघर्ष झालेल्या क्षेत्राचाही या फोटोंमध्ये समावेश आहे. ओपन सोसर्स इंटेलिजन्स एनालिस्टने आपल्या ट्विटर हँडल @detresfaवर उपग्रह फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये दोन साइट्स पाहायला मिळत आहेत, जिथे चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी ग्राउंड-टू-एअर क्षेपणास्त्र साइट बनवित आहे.विश्लेषकांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, सिमटॅक (आणखी एक विश्लेषक) यांच्याबरोबर चीन, भूतान आणि भारताच्या डोकलाममधील ट्रायजंक्शनवर पीएलए हवाई संरक्षण पायाभूत सुविधा तयार करत असल्याचा नवीन पुरावा सापडला आहे. हे दोन्ही देशातील संघर्षाच्या ठिकाणापासून केवळ 50 किलोमीटर अंतरावर आहे. त्याच ठिकाणी 70 दिवस चीन आणि भारतीय सैनिक यांच्यात चकमक सुरू होती.सी -17 ग्लोबमास्टर, 3 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आणि सी -130 जे सुपर हरक्यूलिसचा ताफ्यात समावेशचीनच्या या विद्वेषांच्या पार्श्वभूमीवर भारतानेही तयारी सुरू केली आहे. पूर्व लडाखच्या गलवान व्हॅलीमध्ये भारत आणि चीन यांच्यातील वाढता तणाव लक्षात घेता भारतीय हवाई दलाने प्रत्यक्ष नियंत्रण रेषे(LAC)वरील सर्व प्रमुख केंद्रांवर फ्रंटलाइन सैनिक, हेलिकॉप्टर आणि वाहतुकीचं सामान तैनात केलं आहे. वाढता तणाव लक्षात घेता हवाई सैन्याने सी -17 ग्लोबमास्टर, 3 वाहतूक विमान आणि सी -130 जे सुपर हर्क्युलसचा ताफाही ठेवून भारतानं लष्करी सज्जता आणखी बळकट करण्यासाठी कित्येक आगाऊ तळांवर सैन्य उपकरणे व शस्त्रे पाठवली आहेत. .इल्युशिन-76 शस्त्रास्त्राचादेखील भारतीय हवाई दलाकडून वापरभारत आणि चीनमधील 3,500 किमी वास्तविक नियंत्रण रेषेवरील वायुसेनेनं आपल्या विविध भागातील फॉरवर्ड झोनमध्ये इल्युशिन-76ची तैनाती केली आहे. वायुसेनेने लेह आणि श्रीनगरसह अनेक प्रमुख एअर स्टेशनवर अगोदरच सुखोई 30 एमकेआय, जग्वार, मिराज २००० विमानं तैनात केली आहेत. हवाई दलाने अनेक आगाऊ ठिकाणी सैन्य वाहतूक करण्यासाठी अपाचे आणि चिनूक हेलिकॉप्टरही तैनात केली आहेत. लडाख व इतर भागात हवाई दलाच्या वाढत्या कामांबद्दल विचारले असता, एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, आम्ही कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. गेल्या महिन्यात एअर चीफ मार्शल आर. के. एस भदौरिया यांनी लडाख आणि श्रीनगर हवाई दलाच्या तळांना भेट दिली आणि तेथील कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या सज्जतेचा आढावा घेतला.