पेईचिंग - भारत आणि चीन सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात संघर्ष झाला. भारतीय सीमेवरील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांच्या हल्ल्यात भारताचे 20 जवान शहीद झाले. काही वृत्तसंस्था व वृत्तवाहिन्यांनी भारताने या कारवाईला जशास तसे उत्तर देत चीनचे 43 सैनिक मारल्याचा दावाही केला आहे. मात्र चीनने अद्याप मृतांचा आकडा जाहीर केलेला नाही. तणाव वाढवायचा नसल्यामुळे आकडा जाहीर करणार नसल्याचं चीनने म्हटलं आहे. पण आता चीनबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. अमेरिकेच्या भीतीमुळे चीनने मृत सैनिकांचा आकडा लपवला असल्याची माहिती समोर आली आहे.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, चीन आणि अमेरिका यांच्यात एक महत्त्वाची बैठक होणार होती. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर चीनने भारतासोबत घडलेली घटना किरकोळ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. या धोरणांतर्गत चीनने मृत सैनिकांचा आकडाही जाहीर केला नाही. चीनी सैन्याचे प्रवक्ते झांग शुइली यानी हिंसक झटापटीत दोन्ही बाजूंनी जीवितहानी झाली आहे असं सांगितलं मात्र मृतांचा आकडा सांगण्यास नकार दिला आहे.
पीएलएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या सैनिकांच्या मृत्यूबद्दल चीन अत्यंत संवेदनशील आहे. सैनिकांच्या मृत्यूचे आकडे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या मंजुरीनंतरच समोर येतील. शी जिनपिंग हेच सैन्याचे अध्यक्ष आहेत. त्यामुळ यामागे त्यांचाच संबंध आहे. अमेरिकन परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो यांच्यासोबत बैठक होणार होती. भारता-चीन सीमा वादावर यामध्ये चर्चा करण्यात आली. अमेरिकेसोबतच्या या बैठकीत भारतासोबतच्या संघर्षाचा मुद्दा उचलला जाऊ शकतो, ही भीती चीनला होती. चीनला काहीही करुन पॉम्पियो-यांग यांच्या बैठकीअगोदर तणाव कमी करायचा होता. पण एखादा देश या तणावाचा गैरफायदा घेत असेल, तर आमच्या सैनिकांना योग्य ते उत्तर देता येतं असं म्हटलं आहे.
संयुक्त राष्ट्रानंतर अमेरिकेनेही आता शांततापूर्ण परिस्थितीत वाद मिटवण्याचं आवाहन केलं आहे. अमेरिकन गृह विभागाने शहीद झालेल्या भारतीय जवानांविषयी सहवेदना व्यक्त केली. भारत आणि चीन यांच्यातील एलएसीवर घटनाक्रमावर अमेरिकेचं लक्ष असल्याचं सांगण्यात आलं आहे. चीनमधील विश्लेषकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबतही चर्चा करण्याची शक्यता आहे. कारण ते आर्थिक महत्त्व ओळखून आहेत असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
तब्बल 21 महिने झाले तरी वडिलांनी केले नाहीत मुलावर अंत्यसंस्कार; 'हे' आहे कारण
Today's Fuel Price : इंधन दरवाढीचा भडका! सलग बाराव्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागले
CoronaVirus News : बापरे! 'या' व्यक्तींसाठी कोरोना ठरतोय जीवघेणा; 12 पट अधिक आहे मृत्यूचा धोका