लडाखमध्ये LACवर भारत-चीनमध्ये मोठा संघर्ष झाला आहे. दोन्ही देशांमधल्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत भारताच्या २० जवानांना वीरमरण आलं आहे. तर चीनच्या ४३ सैनिकांना ठार करण्यात आलं आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही चीनला जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सक्षम असल्याचं सांगितलं. मात्र संयुक्त राष्ट्र संघानं दोन्ही देशांनी आक्रमक न होता चर्चेतून तोडगा काढावा, असा सल्ला दिला आहे.
अमेरिकेनं चीनसंदर्भात सावध पवित्रा घेतला असतानाच रशियानं पुन्हा एकदा मैत्रीला जागत भारताला खुलेआम समर्थन दिलं होतं. तसेच आता सध्या लडाखच्या सीमेवरुन सुरु असलेल्या संघर्ष आणि चीनबरोबरची समस्या सोडवण्यासाठी रशियाने भारताला पाठिंबा देत पुढाकार घेतला आहे.
भारत आणि चीन यांच्या दरम्यान सध्या लडाखमधील सीमेवरून सुरू असलेला तणाव कमी करण्यासाठी रशिया पडद्याआडून सूत्रे हलवित आहे. अशी माहिती रशियातील राजनैतिक सूत्रांनी दिल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. तसेच आपल्या हालचालींचे अधिक तपशील रशियाने जाहीर केलेले नाहीत; मात्र जागतिक पातळीवर दोन्ही देशांत सलोखयाचे संबंध राहणे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे रशियाने स्पष्ट केले आहे.
तत्पूर्वी, रशियाचे डेप्युटी चीफ ऑफ मिशन रोमन बाबुश्किन म्हणाले,"आम्हाला आशा आहे की दोघांमधील तणाव लवकरच निवळेल आणि सहकार्याच्या संभाव्यतेचा विचार करून दोन्ही पक्ष सकारात्मक संवाद कायम ठेवतील. रशियाचा विश्वास आहे की, ते या क्षेत्रातील वाद सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील." तसेच यापूर्वी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लॅवरोव्ह म्हणाले होते की, “भारत आणि चीनच्या लष्करी प्रतिनिधींनी संपर्क साधल्याचे आधीच जाहीर केले गेले आहे, सध्या दोन्ही देशांकडून परिस्थितीवर चर्चा सुरू असल्याचे रशियाने सांगितले होते.
भारतीय आणि चिनी सैनिकांमधील हिंसक संघर्षानंतर दोन देशांमधील तणाव वाढतच चालला आहे. पण भारतीय सीमेवर संघर्ष वाढू नये, अशी चीनची भूमिका आहे. सीमावादवरुन दोन्ही देशांमधील हिंसक चकमकीत २० भारतीय जवानांना वीरमरण आले. वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, या चकमकीत भारतीय जवानांनी चीनच्या ४३ सैनिकांचा खात्मा केला. तर चीनला सीमेवर आणखी संघर्ष नको आहे. दोन्ही देशांनी या परिस्थितीतून संवाद आणि चर्चेतून मार्ग काढावा, अशी चीनची भूमिका आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सनं यासंदर्भातील माहिती दिली आहे.
चीन, नेपाळसह आता अमेरिका देणार भारताला झटका?; डोनाल्ड ट्रम्प लवकरच घेणार निर्णय
चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकणार?; भारताच्या आक्रमक भूमिकेवरुन चीननं दिलं मोठं आव्हान
'चीनने आमच्यावरही 'या' पद्धतीने हल्ला करण्याचा केला प्रयत्न'; भारताच्या मित्रानं केलं सावध
कौतुकास्पद! वडिलांच्या कष्टाचं चीज; गवंड्याचा मुलगा झाला तहसीलदार