शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

भारताच्या मित्राला मध्यस्थीत यश येणार?; अन्यथा चीनसोबतचा तणाव पुन्हा वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 12:09 PM

या वाटाघाटीमध्येही LACवरील वादाचे निराकरण झाले नाही, तर दोन्ही देशांमधील राजनैतिक तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचू शकतात.

लडाखमधील LACवर झालेल्या रक्तरंजित संघर्षानंतर भारत अन् चीनमधील तणाव विकोपाला पोहोचला आहे. चीनच्या आक्रमकपणाला भारतानंही जशास तसं उत्तर देण्याची तयारी चालवली आहे. त्याच पार्श्वभूमीवर वास्तविक नियंत्रण रेखे(LAC)वर सुरू असलेल्या तणावात मॉस्कोमध्ये होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची (एससीओ) बैठक भारत-चीन द्विपक्षीय संबंधांसाठी निर्णायक ठरू शकते. दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी रशिया मॉस्को येथे भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. या वाटाघाटीमध्येही LACवरील वादाचे निराकरण झाले नाही, तर दोन्ही देशांमधील राजनैतिक तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचू शकतात.वस्तुतः लष्करी व मुत्सद्दे पातळीवर अनेक फे-या बोलूनही चीनच्या वृत्तीमुळे हा वाद मिटला नाही. जयशंकर एससीओच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला येणार आहेत, असे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यांच्या चिनी समकक्ष वांग यी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. एलएसी वादावर चीनकडून काही ठोस पुढाकार घेण्याची भारताची अपेक्षा आहे. हे निश्चित आहे की, जर या बैठकीवर सहमती झाली, परंतु त्यामध्ये काहीही सकारात्मक तोडगा निघू शकला नाही तर दोन्ही देशांमधील मुत्सद्दी व सैनिकी पातळीवरील संघर्ष शिगेला पोहोचतील. भारत सतत चीनला तसा निरोप देत आहे.गेल्या आठवड्यात चीनला वरच्या स्तरावरून भारतानं दोन मोठे संदेश दिले आहेत. सीडीएस बिपीन रावत म्हणाले की, हा वाद मिटविला नाही तर भारत लष्करी कारवाईचा पर्याय वापरू शकतो. तर परराष्ट्रमंत्र्यांनी 1962नंतर लडाखमधील अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीचा उल्लेख केला. भारत आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. हा प्रत्यक्ष चीनला संदेश असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. भारताचा संयम सातत्याने कमी होत आहे. आतापर्यंत 106 अॅप्सवर बंदी घालून भारताने आणखी 225 अॅप्सची यादी तयार केले आहेत. जयशंकर-वांग यी यांच्यात होणाऱ्या चर्चेत कोणताही तोडगा न निघाल्यास भारत या योजनेची भारत जलद अंमलबजावणी करेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.भारत आपल्या भूमिकेवर ठाम जयशंकर-वांग यी यांची भेट 9 ते 11 सप्टेंबरदरम्यान होऊ शकते. या बैठकीत भारत आपल्या जुन्या भूमिकेवर ठाम राहील. सीमा विवादात वाटाघाटी करण्यापूर्वी चीनने एलएसीवरील आपले स्थान पूर्ववत करावे, अशी भारताची इच्छा आहे. लष्करी व मुत्सद्दी पातळीवरील चर्चेत चीन यास सहमती देत ​​आहे, परंतु जमिनीवर झालेल्या चर्चेदरम्यान झालेल्या कराराचे पालन करीत नाही.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत