शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

चीनला घाम फुटणार...; भारत व्हिएतनामला मोठं गिफ्ट देणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 12:32 PM

भारताच्या या घोषणेमुळे चीनचे टेन्शन वाढू शकते.

केवळ भारतच नाही, तर इतरही अनेक शेजारील देसांसोबत चीनचे संबंध बरे नाहीत. यातच एक नाव म्हणजे व्हिएतनाम. भारता प्रमाणेच व्हिएतनामही चीनच्या धमक्यांना जशास तसे उत्तर देत असतो. यातच भारत दौऱ्यावर असलेल्या संरक्षण मंत्र्यांच्या भेटीदरम्या भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मोठी घोषणा केली आहे. भारत व्हिएतनामला स्वदेशी बनावटीची आयएनएस कृपाण गिफ्ट करणार आहे. भारताच्या या घोषणेमुळे चीनचे टेन्शन वाढू शकते.

व्हिएतनामचे संरक्षणमंत्री जनरल फान वान जियांग यांच्या भेटीदरम्यान भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी घोषणा करत, मित्र व्हिएतनामला स्वदेशी बनावटीची आयएनएस कृपाण ही युद्धनौका गिफ्ट देण्याची घोषणा केली आहे. याच बरोबर, भारताने व्हिएतनामसोबत पाणबुडी आणि फायटर जेट ऑपरेशन्स, सायबर सुरक्षा आणि व्हिएतनामी सैनिकांचे प्रशिक्षण वाढविण्यासंदर्भात विचार करण्यात यावा असे म्हटले आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि त्यांचे व्हिएतनामचे समकक्ष जनरल फान वान जियांग यांच्या सोमवारी नेतृत्वात प्रतिनिधा मंडळस्थळावरील चर्चा पार पडली. यात प्रामुख्याने परस्पर सहकार्याचे क्षेत्र, विशेषत: संरक्षण-औद्योगिक सहकार्य आणि सागरी सुरक्षा आदींवर चर्चा झाली. या शिवाय, जमिनीवरून हवेत मारा करणारी आकाश क्षेपणास्त्र प्रणाली, ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रे आणि इतर लष्करी हार्डवेअर संदर्भात संभाव्य अधिग्रहणासंदर्भातही दोन्ही देशांमध्ये सकारात्मक चर्चा झाली.

यावेळी व्हिएतनामच्या संरक्षणमंत्र्यांनी संरक्षण संशोधन आणि संरक्षण औद्योगिक क्षमता वाढवण्याच्या पद्धतींवर चर्चा करण्यासाठी DRDO च्या मुख्यालयालाही भेट दिली. महत्वाचे म्हणजे, "व्हिएतनाम स्वदेशी बनावटीचे आकाश हवाई संरक्षण मिसाईल्स सारखी प्रणाली मिळविण्यासाठीही भारतासोबत चर्चा करत आहे. या डील सांठी त्यांनी उत्सुकता दर्शवली आहे."

आयएनएस कृपाणची ताकद आयएनएस हे स्वदेशी बनावटीचे जहाज आहे. हे जहाज भारतीय नोदलाचे एक अभिन्न अंग आहे. 1350 टन वजनाचे हे अत्याधुनिक जहाज 91 मीटर लांब, तर 11 मीटर रुंदीचे आहे. समुद्रात 46 किमी प्रति तास वेगाने यात 120 लोक राहू शकतात. यात 30 एमएमची क्लोज रेन्ज गनही असते. जी पृष्ठभागावरून पृष्ठ भागावर मारा करणाऱ्या मिसाईलने सज्ज आहे. ही नौका 1991 मध्ये भारतीय नौदलात सामील करण्यात आली होती.

 

टॅग्स :IndiaभारतchinaचीनVietnamविएतनाम