India vs Pakistan, Aditya L1: चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-३ च्या सुरक्षित लँडिंगनंतर भारतीय अंतराळ संस्था इस्रोने आदित्य-एल१ चे यशस्वी प्रक्षेपण करून इतिहास रचला आहे. मात्र, अंतराळ क्षेत्रातील भारताची प्रगती आणि यश आपल्या शेजारी देश पाकिस्तानमधील काही लोकांना पसंत पडत नाही. ADITYA-L1 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल, अनेक पाकिस्तानी लोकांच्या प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यात भारताच्या प्रगतीबद्दल त्यांची ईर्ष्या दिसून येत आहे. ADITYA-L1 मिशनच्या यशानंतर काही स्थानिक माध्यमांनी याबाबत पाकिस्तानी लोकांचे मत विचारले असता त्यांनी आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिली.
ADITYA-L1 मोहिमेबाबत एका महिलेने सांगितले की, 'भारत हा आपला शत्रू आहे, ते चंद्र-सूर्याकडे जात आहेत, जर ते पुढे गेले तर तो आपला अपमान आहे.' एका पाकिस्तानी माणसाने सांगितले की, ही काही मोठी गोष्ट नाही, आपणही एक दिवस चंद्र-सूर्यापर्यंत पोहोचू.
'भारत आपल्यापेक्षा हजार वर्षे पुढे आहे'
यासाठी एका पाकिस्तानी नागरिकाने आपल्या सरकारला दोष दिला असला तरी, भारत आपल्यापेक्षा एक हजार वर्षे पुढे गेला आहे आणि आमचा काहीही सामना नाही, असे त्याने म्हटले आहे. ते शास्त्रज्ञाला राष्ट्रपती बनवतात आणि पाकिस्तान त्या शास्त्रज्ञाला माफी मागायला लावतात. मीडियाच्या प्रश्नावर आणखी एका पाकिस्तानी नागरिकाने सांगितले की, भारताने पाकिस्तानकडे दुर्लक्ष केले आहे, आता ते अमेरिका आणि चीनशी स्पर्धा करत आहेत, पाकिस्तान स्वत:चं मरण ओढवून घेत आहे.
'भारत-पाकिस्तानमध्ये स्पर्धा नाही'
ADITYA-L1 च्या यशस्वी प्रक्षेपणावर, एका पाकिस्तानी महिला पत्रकाराने सांगितले की, भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणतीही स्पर्धा असू शकत नाही, आम्ही शून्यावर उभे असताना ते 100 पावले पुढे आहेत. त्यांचा विकास दर सात टक्के आहे तर आमचा शून्य आहे. भारताच्या मदतीशिवाय पाकिस्तान पुढे जाऊ शकत नाही. अमेरिकेत राहणारे पाकिस्तानी विचारवंत साजिद तरार यांनी ADITYA-L1 च्या यशाबद्दल भारताचे अभिनंदन केले आणि हे भारताचे यश असल्याचे सांगितले. अमेरिकेतून पदवी घेऊन त्यांचे लोक भारतात जातात आणि पाकिस्तानातील लोक उपासमारीने देश सोडून जातात. येत्या काळात पाकिस्तानचे लोक फक्त गवतच खातील कारण तुमच्याकडे पर्याय नाही असेही ते म्हणाले.