इस्लामाबाद: संयुक्त राष्ट्राने जागतिक दहशतवादी घोषित केल्यानंतर अब्दुल रहमान मक्की याने पाकिस्तानातील कोट लखपत तुरुंगातून स्वतःचा एक व्हिडीओ जारी करून त्यासाठी भारतालाच जबाबदार धरले आहे. ज्या आरोपांच्या आधारे त्याला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आले आहे, त्या सर्व भारत सरकारने पसरवलेल्या अफवा आहेत, मी ओसामा बिन लादेन किंवा अल कायदाचा नेता अयमान अल-जवाहिरी यांना कधीही भेटलाे नाही, असा कांगावा मक्कीने केला आहे.
मक्की याने दहशतवादी संघटना अल कायदा आणि इस्लामिक स्टेटशी संबंध असल्याचा आरोप फेटाळून लावला. या दोन दहशतवादी संघटनांची विचारधारा त्यांच्यापेक्षा पूर्णपणे वेगळी असल्याचे तो म्हणाला. एवढेच नाही तर अल कायदा आणि इसिसने केलेल्या सर्व हल्ल्यांचा निषेधही त्याने केला.