ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. ७- पाकिस्ताननं प्रमाणापेक्षा जास्त शस्त्रसाठा केला आहे. मात्र आणखी शस्त्रसाठा न करण्याच्या मुद्दा आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तान भारताशी चर्चा करण्यास तयार झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी भारत आणि पाकिस्ताननं अणुशक्ती कमी करण्यावर भर दिला पाहिजे. त्याचबरोबर दोन्ही लष्कराला सैन्याचा सिद्धांत विकसित करण्याची गरज असल्याचंही प्रतिपादन केलं आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालय प्रवक्त्यानंही आम्ही पाकिस्तान आणि भारतात शांतता नांदावी यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामांच्या सूचनेवर विचार केला आहे. दोन्ही देशांचे सिद्धांत विकसित करणे गरजेचं आहे, जेणेकरून दोन्ही देश स्वतःच्या मार्गापासून भरकटणार नाहीत. पाकिस्तान शस्त्रास्त्रं कमी करण्यावर भारतासोबत चर्चा करण्यास तयार असल्याचंही यावेळी पाकचे परराष्ट्र प्रवक्ते नफीस जकारियांनी सांगितलं आहे. पाकिस्तानची अणुशक्ती ही आत्मसंरक्षणासाठी असल्याचंही यावेळी जकारियांनी सांगितलं आहे. आमच्या समोर दोन आव्हानं आहेत. अणुशक्ती बाळगणारे अमेरिका आणि रुस हे दोन मोठे देश जोपर्यंत नेतृत्व करण्यास तयार होत नाहीत तोपर्यंत अणुशक्तीमध्ये कमी होणं मुश्कील असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामांनी सांगितलं आहे. ओबामांनी दोन दिवस चाललेल्या वॉशिंग्टनमधल्या सुरक्षा शिखर संमेलनात प्रतिपादन केलं होतं.