लंडन : भारतीय अमेरिकी लेखक अखिल शर्मा यांना त्यांची दुसरी कादंबरी ‘फॅमिली लाइफ’साठी प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय डब्लीन साहित्य पुरस्कार घोषित झाला असून, एक लाख युरो, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आयर्लंडकडून हा पुरस्कार दिला जातो. कादंबरीसाठी दिला जाणारा हा जगातील सर्वाधिक रकमेचा पुरस्कार आहे. दिल्लीत जन्मलेले शर्मा न्यूयॉर्कमध्ये वास्तव्याला आहेत. त्यांना त्यांच्या आत्मकथेसाठी २०१५ मध्ये ४० हजार पौंडांचा फोलियो पुरस्कार मिळाला होता. डब्लिन पुरस्कारासाठी १६० नामांकने आली होती. त्यातून शर्मा यांच्या कादंबरीची निवड करण्यात आली. ‘फॅमिली लाइफ’ ही कादंबरी लिहिण्यासाठी शर्मा यांना १३ वर्षे लागली. पुरस्कारातील रकमेतून भावाच्या नावे शिष्यवृत्ती सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. (वृत्तसंस्था)
भारतीयाला १ लाख युरोचा पुरस्कार
By admin | Published: June 10, 2016 4:41 AM