संयुक्त राष्ट्र : भारतात २००२ ते २०१२ दरम्यान पाच वर्षांहून कमी वयाच्या नोंदणी न झालेल्या बालकांची संख्या सर्वाधिक असून बालविवाहाबाबतही हा देश दुस-या स्थानावर असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालात म्हटले आहे. यात लसीकरणाची व्याप्ती वाढविण्यासह स्त्रीभ्रूण चाचणी बंद करण्याची आवश्यकताही प्रतिपादित करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाची बाल संघटना युनिसेफच्या ‘इम्प्रुव्हिंग चिल्ड्रेन्स लाईव्हज्, ट्रान्लफार्मिंग द फ्युचर - २५ इयर आॅफ चाईल्ड राईट्स इन साऊथ आशिया या अहवालात बालकांच्या जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या महत्त्वपूर्ण मुद्यांचा ऊहापोह आहे. भारतात २०००-२०१२ दरम्यान पाच वर्षांहून कमी वयाच्या ७.१ कोटींहून अधिक बालकांची नोंदणी झालेली नसून जगात हे प्रमाण सर्वाधिक आहे. दक्षिण आशियात जन्मनोंदीचे प्रमाण वाढले. मात्र, त्याचा वेग खूपच मंद राहिला, असेही या अहवालात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
बालविवाहात भारत दुस-या स्थानावर
By admin | Published: September 13, 2014 2:21 AM