वॉशिंग्टन : अमेरिका, भारत आणि जपान यांनी मंत्री पातळीवर भागीदारी उन्नत करण्यासाठी त्रिपक्षीय कराराचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात पहिली बैठक न्यूयॉर्कमध्ये पुढील आठवड्यात होईल.संयुक्त राष्ट्रांची आमसभा पुढील आठवड्यात न्यूयॉर्कमध्ये होईल. या निमित्त मी आणि सुषमा स्वराज जपानचे परराष्ट्रमंत्री किशिदा यांची धोरणांच्या समन्वयासाठी भेट घेणार आहोत, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी म्हणाले. सध्या चीनचा जपान आणि दक्षिण पूर्व आशियातील काही देशांशी समुद्र हद्दीचा वाद सुरू आहे. वादग्रस्त दक्षिण चीन समुद्रात जमीन बनविण्याचा प्रयत्न चीनने थांबवावा, असे अमेरिकेने त्याला बजावले आहे. डब्लिन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आयर्लंडमध्ये बुधवारी आगमन झाले. आयर्लंडशी द्विपक्षीय संबंध व सहकार्य बळकट करण्यासाठी मोदी यांचा हा दौरा आहे. ६० वर्षांनंतर आयर्लंडला भेट देणारे मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. याआधी १९५६ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी आयर्लंडला भेट दिली होती. मोदी हे भारतीय वंशाच्या नागरिकांशी संवाद साधतील. आयर्लंडमध्ये भारतीय वंशाचे २६ हजार लोक आहेत. (वृत्तसंस्था)
भारत, अमेरिका, जपान करार करणार
By admin | Published: September 23, 2015 10:42 PM