इस्लामाबाद- पुलवामा दहशतवादी हल्ल्याला भारतानं एअर स्ट्राइक करून चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय वायुसेनेच्या मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांवर 1000 किलोचे बॉम्ब फेकले. यात जवळपास 200 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही कारवाई सर्जिकल स्ट्राइक 2च्या नावानं सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनीही भारताला धमकी दिली आहे.ते म्हणाले, भारताला या हल्ल्याचं चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, भारतानं पाकिस्तानवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे. भारतानं एलओसीचं उल्लंघन केलं आहे. पाकिस्तानला प्रत्युत्तरादाखल आत्मसंरक्षणासाठी कारवाई करण्याचा अधिकार आहे. मी पंतप्रधान इम्रान खान यांना भेटणार आहे आणि परराष्ट्र मंत्र्यांचं मत त्यांच्यासमोर मांडणार आहे. भारतीय हवाई दलानं पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राइकनंतर परराष्ट्र मंत्री कुरैशी यांनी आपात्कालीन बैठक बोलावली आहे. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. पाकिस्ताननं या मुद्द्यावर जगभरातील अनेक देशांशी चर्चा केली आहे. पाकिस्तानचे सैनिक भारताच्या कारवाईचं उत्तर देण्यासाठी तयार आहेत. पंतप्रधान इम्रान खान विशेष बैठक बोलावणार आहेत.
Indian Air Strike on Pakistan: भारताला जशास तसे उत्तर देऊ, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 2:34 PM
पुलवामा दहशतवादी हल्ल्याला भारतानं एअर स्ट्राइक करून उत्तर दिलं आहे.
ठळक मुद्देपुलवामा दहशतवादी हल्ल्याला भारतानं एअर स्ट्राइक करून चोख प्रत्युत्तर दिलं आहे.पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनीही भारताला धमकी दिली आहे.भारताला या हल्ल्याचं चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, भारतानं पाकिस्तानवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे.