ऑनलाइन लोकमत
ब्रसेल्स, दि.३१ - तीन देशांच्या दौ-यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेल्जियममधील ब्रसेल्स एक्सपोमध्ये भारतीय नागरिकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली आणि हल्ल्याचा निषेध केला. तसेच, दहशवाद हा मानवतेला आव्हान देत असून कोणात्याही एका राष्ट्राला किंवा धर्माला देत नाही. त्यामुळे सर्व देशांनी एकत्र येऊन याचा सामना केला पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.
भारत दहशतवादाला झुकणार नाही आणि झुकण्याचा प्रश्नच येत नाही. गेल्या वर्षात ९० देश दहशतवादाला बळी पडले आहेत. फक्त बॉम्ब आणि बंदुकांनी दहशतवाद संपणार नाही, त्यासाठी समाजाला जागरुक केले पाहिजे. दहशतवाद कोणत्याही धर्माशी जोडला जात नाही किंवा कोणताही धर्म दहशतवाद शिकवत नाही, अशा शब्दात त्यांनी दहशतवादाचा निषेध केला.
पंतप्रधान मोदींच्या भाषणातील काही मुद्दे ...
- दिशा योग्य असेल आणि पॉलिसी स्पष्ट असेल तर भारताला पुढे जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही.
- पाच कोटी गरिब लोकांना गॅस कनेक्शन देण्यात येणार.
- माझ्या विनंतीवरुन ९० लाख लोकांनी गॅस सब्सिडी सोडली.
- २०१५ मध्ये सर्वाधिक जास्त नागरिकांना गॅस सिलेंडर मिळाले.
- सर्वाधिक जास्त दुध उत्पादन २०१५ मध्ये झाले.
- २०१५ मध्ये सर्वाधिक जास्त वीज आणि कोळसा उत्पादन झाले.
- देशातील १८,००० गावांना वीज पुरवठा केला.
- आजच्या काळात शेतक-यांना युरियासाठी रांगेत उभारावे लागत नाही.
- देश स्वातंत्र्य झाल्यानंतर सर्वाधिक युरियाचे उत्पादन २०१५ मध्ये झाले आहे.
- सव्वा चार लाख शाळांमध्ये टॉयलेट बांधले.
- मी स्वत:ला पंतप्रधान मानत नाही, तर सेवक मानतो.
- सलग दोन वर्षे पाऊस कमी पडला, परंतु भारतातील अर्थव्यवस्थेत तेजी कायम आहे.
- आर्थिक मंदीच्या काळात जगाचे लक्ष भारताकडे आहे.
- दहशवाद हा मानवतेला आव्हान देत असून कोणात्याही एका राष्ट्राला किंवा धर्माला देत नाही.
- दहशतवादाचा सर्व देशांनी एकत्र येऊन याचा सामना केला पाहिजे.
- भारत दहशवादाला झुकणार नाही आणि झुकण्याचा प्रश्नच येत नाही.
- फक्त बॉम्ब आणि बंदुकांनी दहशतवाद संपणार नाही.
- दहशतवाद संपविण्यासाठी समाजाला जागरुक केले पाहिजे.
- यूएनला सुद्धा माहित नाही दहशतवाद काय आहे ते.
- दहशतवाद कोणत्याही धर्माशी जोडला जात नाही किंवा कोणताही धर्म दहशतवाद शिकवत नाही.