बिजिंग : लडाखमध्ये भारतीय जवानांवर पाठीत वार करत हल्ला करणाऱ्या चीनने आता जपानकडे नजर वळविली आहे. भारताबरोबरच्य़ा हल्ल्याची धूळ न ओसरते तोच चीनने विस्तारवादी मानसिकतेचे विकृत रुप दाखविण्यास सुरुवात केली आहे. यामुळे आशिया खंडावर मोठ्या युद्धाचे ढग दाटू लागले आहेत.भारत, तैवान, हाँगकाँगनंतर आता चीनची नजर जपानच्या बेटांवर गेली आहे. यामुळे जपानसोबत वाद पेटण्याची शक्यता असून अमेरिकाही यामध्ये थेट उडी घेण्याची दाट शक्यता आहे. चीन आणि जपान दोघेही या निर्जन बेटांवर दावा करतात. या बेटांना जपानमध्ये सेनकाकू आणि चीनमध्ये डियाओस नावाने ओळखले जाते. या बेटांवर चीनची सत्ता नसून 1972 पासून सारे हक्क जपानकडेच आहेत. तर चीनचा दावा असा आहे की ही बेटं चीनच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतात. यामुळे या बेटांचा दावा जपानने सोडून द्यावा. एवढेच नाही तर चीनची कम्युनिस्ट पार्टीने या बेटांचा ताबा मिळविण्यासाठी सैन्य कारवाई करण्याची धमकीही देऊन टाकली आहे.
जपानचे नौदल करते सुरक्षासेनकाकू बेटं जपानच्या ताब्यात आहेत. यावर चीनचा डोळा असल्याने जपानचे नौदल याची सुरक्षा पाहते. अशामध्ये जर चीनला या बेटांचा ताबा मिळवायचा असेल तर त्याला जपानसोबत युद्ध करावे लागणार आहे. मात्र, जगातील तिसरी सर्वात मोठी सैन्य ताकद असलेल्या चीनला हे करणे सहज सोपे नाहीय. गेल्या आठवड्यात चीनच्या काही युद्धनौका या बेटाजवळ गेल्या होत्या. यावरून जपान आणि चीनमध्ये तणाव वाढून त्याचे पर्यावसान धुमश्चक्रीमध्ये होण्याची मोठी शक्यता होती.
जपानला अमेरिकेचे संरक्षणजर चीनला जपानवर हल्ला करायचा असेल तर आधी अमेरिकेसोबत लढावे लागणार आहे. कारण दुसऱ्या महायुद्धानंतर पर्ल हार्बरवर लष्करी तळ बनविताना अमेरिका आणि जपानमध्ये एक करार झाला होता. यानुसार जपानच्या संपूर्ण संरक्षणाची जबाबदारी ही अमेरिकेची असणार आहे. यामुळे जर चीनने जपानवर हल्ला केला तर तो अमेरिकेवर हल्ला केला असे मानले जाणार आहे. असे झाल्यास अमेरिका या युद्धात उतरणार आहे. आणि जर जपान आणि अमेरिकेने चीनवर हल्ला केल्यास तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटणार आहे, हे सर्वज्ञात आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
High अलर्ट! भारतावर सर्वांत मोठ्या सायबर हल्ल्याची शक्यता; मोठ्या संकटाचा इशारा
Solar Eclipse : ग्रहण संपताच...! शास्त्रानुसार करा घराची शुद्धी; हे आहेत सोपे उपाय
मगरमिठी! निम्म्याहून अधिक जगावर चीनच्या कर्जाचा डोंगर; भारतात एवढा नंबर
Solar Eclipse 2020 : दुर्लभ योग! सूर्याने रंग बदलले; पहा सूर्यग्रहणाची टिपलेली छायाचित्रे
CoronaVirus देशाला कोरोनाचे ग्रहण! रुग्णांचा आकडा 4 लाख पार; मृत्यूचा उच्चांक
२५ हजारांपेक्षाही स्वस्त किंमतीत OnePlus चा फोन येणार; एकापेक्षा एक धासू फिचर देणार
Solar Eclipse 2020 : थोड्याच वेळात यंदाचे सर्वांत मोठे सूर्यग्रहण; 'इथे' LIVE पाहता येणार