शहरं
Join us  
Trending Stories
1
JEE Main Result 2025: महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! जेईई परीक्षेत राज्यातील तिघांना १०० टक्के गुण
2
तनिषा भिसेंना न्याय मिळणार का? चौकशी अहवालांच्या खेळात गांभीर्य हरवले, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष
3
मराठी भाषेचं नुकसान आम्ही सहन करणार नाही; हिंदी भाषेची सक्ती, सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला इशारा
4
"हे बघ, तुझा मुलगा मेला"; डोक्यात खिळा ठोकून चिमुकल्याची निर्घृण हत्या, आईला दिला मृतदेह
5
पुण्यावरून चंद्रपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला यवतमाळजवळ भीषण अपघात; ३० प्रवासी जखमी
6
बार्शीत एमडी ड्रग्जसह गावठी पिस्तूल जप्त,आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी; तुळजापूर कनेक्शन?
7
प्रेक्षक-समीक्षकांकडून कौतुक तरीही कमाई कमीच! 'केसरी २'चा पहिल्या दिवशीचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर
8
Video - भलताच छंद! 'ती' डास मारते, जपून ठेवते अन् त्याला खास नाव देते; ठेवलाय अजब रेकॉर्ड
9
खेड तालुक्यात खळबळजनक घटना! ग्रामस्थांनी नराधमाच्या घरासमोरील ट्रॅक्टर पेटवला, घरालाही लावली आग
10
मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत; एक्स्प्रेस गाड्याही रखडल्या!
11
First ATM: केवळ ११,२०० लोकसंख्येचा असा देश, जिथे एकही ATM नव्हतं; आता सुरु झालं पहिलं एटीएम
12
तिसऱ्या मुंबईच्या पायाभूत सुविधांसाठी कोरियाचा हातभार, कुठे असेल तिसरी मुंबई?
13
IPL- एक ‘डॉट बॉल’ पडला, की लागतील ५०० झाडे!
14
भीषण, भयंकर! ...अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; १७ सेकंदाचा अंगावर काटा आणणारा Video
15
शाहरुखच्या 'सर्कस' मालिकेतील मारियासाठी रेणुका शहाणेंना नव्हती पहिली पसंती, पण अशी मिळाली ही भूमिका
16
उपचार घेत असलेल्या एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार, ICU लॅबमधील टेक्निशियनला अटक; CCTV मुळे आरोपी जाळ्यात
17
धोनी, अशनीर ग्रोव्हर ते दीपिका पादुकोण... BluSmart मध्ये दिग्गजांचे पैसे बुडाले, आता कंपनी बुडण्याच्या मार्गावर
18
भारतीय अँजिओप्लास्टीचे जनक डॉ. मॅथ्यू सॅम्युएल यांचे निधन, नेत्यांपासून ते उद्योगपतींवर केले होते उपचार
19
Mumbai: चेंबूर परिसरात बीएमसीचा कचरावाहू ट्रक उलटला; एकाचा मृत्यू, दोन जखमी
20
बेकायदा बांधकामांमुळे नियोजित विकासाला धोका, उच्च न्यायालयाने 'बीएमसी'ला फटकारले

दुबईत पार्किंगवरुन भारतीय आणि पाकिस्तानी व्यक्तीचा वाद; न्यायालयाने एकाला देशातून काढले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 18:20 IST

दुबईतील कायदे अतिशय कडक आहेत.

Dubai Law : दुबई एक असा देश आहे, जो आपल्या कठोर कायद्यांसाठी ओळखला जातो. जगातील सर्वात सुरक्षित देशांमध्येही दुबईची गणना केली जाते. दुबईचे कायदे अनेकदा चर्चेत असतात. सध्या दुबईतील एका प्रकरणाची जोरदार चर्चा होत आहे, ज्यात किरकोळ पार्किंगच्या वादामुळे दोघांना कठोर कायद्याचा सामना करावा लागला.

पार्किंगचा वाद, थेट देश सोडण्याचा आदेशगल्फ न्यूजनुसार, ही घटना गेल्या वर्षी 8 फेब्रुवारी रोजी घडली होती. दुबईच्या टेलिकॉम क्षेत्रात पार्किंगवरुन एक भारती आणि एक पाकिस्तानी, अशा दोघांमध्ये किरकोळ वाद झाला आणि वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या प्रकरणी न्यायालयाने एका पाकिस्तानी वृद्धाला तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्याची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्याला देशातून हद्दपार करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

वाद कसा झाला?मिळालेल्या माहितीनुसार, एका 70 वर्षीय पाकिस्तानी व्यक्तीने 34 वर्षीय भारतीय व्यक्तीची पार्किंगची जागा बळकावली होती. हे प्रकरण इतकं तापलं की, संतापलेल्या पाकिस्तानी व्यक्तीने भारतीयाला धक्काबुक्की केली. यावेळी भारतीय व्यक्तीचा तोल गेला आणि तो जमिनीवर कोसळला. या घटनेत त्याच्या डाव्या पायाच्या फ्रॅक्चर झाल्यामुळे, त्याने पायाची कार्यक्षमता 50 टक्के गमावली, म्हणजेच त्याला त्याच्या पायात अपंगत्व आले.

प्रत्युत्तरात भारतीयानेही हल्ला केलाया घटनेनंतर भारतीय व्यक्तीनेही वृद्ध पाकिस्तानी व्यक्तीच्या डोक्यात मारले. त्याचा परिणाम असा झाला की, पाकिस्तानी व्यक्ती सुमारे 20 दिवस आपले दैनंदिन काम करू शकला नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांनाही ताब्यात घेतले. अखेर दुबईच्या न्यायालयाने पाकिस्तानी व्यक्तीला दोषी ठरवत तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. शिवाय, शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्याला दुबईतून हद्दपार केले जाईल. 

टॅग्स :DubaiदुबईCrime Newsगुन्हेगारीInternationalआंतरराष्ट्रीयIndiaभारतPakistanपाकिस्तान