गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानातूनभारतात आलेल्या सीमा हैदरची चर्चा सुरू होती. पण, आता भारतातूनपाकिस्तानात गेलेल्या अंजूचे प्रकरण चर्चेत आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फेसबुक फ्रेंडला भेटण्यासाठी अंजू पाकिस्तानात गेली आणि तिथेच इस्लाम धर्म स्वीकारुन फातिमा बनली आहे. एवढंच नाही, तर तिने नसरुल्लाहसोबत लग्नही केले आहे. तिच्या कथित लग्नाबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान एक प्रतिज्ञापत्र समोर आले आहे. जाणून घ्या यात नेमकं काय लिहिले आहे...
प्रतिज्ञापत्रात काय लिहिले आहेमीडियामध्ये व्हायरल झालेल्या प्रतिज्ञापत्रात असे म्हटले आहे की, 'नाव- फातिमा, वडील- प्रसाद, पत्ता- अलवर, राजस्थान, भारत. मी प्रतिज्ञापत्रावर घोषित करते की, माझे पूर्वीचे नाव अंजू होते आणि मी ख्रिश्चन धर्माची होते. मी माझ्या स्वखुशीने, कोणत्याही दबावाशिवाय इस्लामचा स्वीकार केला आहे. मला यासाठी कोणतीही जबरदस्ती नव्हती. मी, नसरुल्ला, वडील गुल मौला खान, पत्ता- दिर, खैबर पख्तुनख्वा, याच्यावर प्रेम करते आणि त्याच्यासाटी माझ्या देशातून पाकिस्तानात आले आहे.'
'मी माझ्या स्वत:च्या इच्छेनुसार नसरुल्लाशी साक्षीदारांसमोर शरियत-ए-मोहम्मदीनुसार 10 तोळे सोन्याच्या हुंडा देऊन लग्न करत आहे. शरियत कायद्यानुसार, नसरुल्ला माझे पती आहेत. मी नसरुल्लाहशी माझ्या इच्छेनुसार लग्न केले आहे. हे माझे विधान सत्य आणि बरोबर आहे. मी यात काहीही लपवले नाही.'
नेमकं प्रकरण काय...राजस्थानच्या अलवरची रहिवासी असलेल्या अंजुची फेसबुकवरुन पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वामधील नसरुल्लाहसोबत मैत्री झाली. त्याला भेटण्यासाठी अंजू व्हिसा काढून पाकिस्तानात गेली. आता तिने इस्लाम स्वीकारुन लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. ख्रिश्चन धर्मातून इस्लाम धर्मात गेलेल्या अंजूने तिचे नाव बदलून फातिमा ठेवले आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंजू आणि नसरुल्लाहने लग्न आणि धर्म परिवर्तनाच्या बातम्यांचे खंडन केले आहे. या सर्व चर्चेदरम्यान एक प्रतिज्ञापत्र समोर आले आहे.
लग्नापूर्वी प्री वेडिंग शूट करण्यात आलाभारतातून पाकिस्तानात पोहोचलेल्या अंजू आणि नसरुल्लाच्या लग्नाच्या बातम्या समोर आल्यानंतर सोशल मीडियावर व्हिडिओ समोर आला आहे. यात अंजू आणि नसरुल्ला अतिशय रोमँटिक पद्धतीने एकमेकांचा हात धरताना दिसत आहेत. हे व्हिडीओ पाहून असे मानले जात आहे की, निकाहपूर्वी त्यांनी प्री-वेडिंग शूट केला आहे.