वॉशिंग्टन : अमेरिकेतील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्या राष्टÑीय स्पेलिंग बी स्पर्धेत दोन भारतीय स्पर्धक विजयी झाले असून, पहिला क्रमांक श्रीराम जे हाथवार व अन्सून सुजय यांच्यात विभागून देण्यात आला आहे. या मुलांनी अटीतटीच्या स्पर्धेत २५ शब्दांचे स्पेलिंग अचूक सांगितले असून, १९६२ नंतर प्रथमच ही स्पर्धा टाय झाली आहे. ही स्पर्धा भारतीय मुलांनी सलग सात वर्षे जिंकली आहे. अमेरिकेतील लाखो लोकांनी ही स्पर्धा अत्यंत औत्सुक्याने पाहिली. स्क्रीप्स राष्टÑीय स्पेलिंग बी स्पर्धेत सात वर्षे भारतीय मुलांची नावे कोरलेली आहेत. श्रीराम हा गणित व विज्ञान पर्यायी शाळेत ८ व्या वर्गात शिकत असून, तो न्यूयॉर्कचा रहिवासी आहे. तर अन्सून ही टेक्सासची रहिवासी असून, सातवीत शिकत आहे. गेल्या वर्षाप्रमाणेच यावर्षीही पहिल्या तीन क्रमांकावर भारतीय मुले होती. श्रीराम , अन्सून व गोकुल व्यंकटाचलम हे पहिल्या तीन क्रमांकांवर होते. स्पेलिंग बी स्पर्धेत विजयी झाल्याने माझे स्वप्न पूर्ण झाले आहे, असे श्रीरामने निकाल जाहीर होताच सांगितले. स्पर्धेच्या २२ व्या फेरीत अन्सूनने फ्युलिटन (एफइयूआय डबलएल इटीओएन ) या शब्दाचे अचूक स्पेलिंग सांगितले. हे एका युरोपियन मनोरंजक मासिकाचे नाव आहे, तर २१ व्या फेरीत श्रीराम याने स्टीचोमिथिया या शब्दाचे अचूक स्पेलिंग सांगितले. वादविवाद असा या शब्दाचा अर्थ आहे. श्रीरामची या स्पर्धेत सहभागी होण्याची ही पाचवी वेळ आहे. या दोघांनाही रोख ३० हजार डॉलर, चषक व इतर बक्षिसे मिळतील. १९६२ साली बी स्पर्धा टाय झाली होती, ८९ वर्षे इतिहास असणार्या या स्पर्धेत १९६२,१९५७ व १९५० अशी तीन वर्षे बक्षीस विभागून देण्यात आले होते. एकदा तीन स्पर्धक स्पर्धेत राहिले की पुढची फेरी २५ शब्दांची असते. एका स्पर्धकाने सलग दोन शब्दांचे चुकीचे स्पेलिंग सांगितल्यास तो बाद होतो, प्रतिस्पर्ध्याने सलग दोन शब्द बरोबर सांगितल्यास त्यांची पुढच्या फेरीत निवड होते. स्पेलिंग सांगण्यासाठी शब्द संपल्यास सहविजेते जाहीर केले जातात. या स्पर्धेवर भारतीय मुलांचा दबदबा आहे. २००८ पासून ही स्पर्धा भारतीय मुलेच जिंकत आहेत. २००८- समीर मिश्रा, २००९- काव्या शिवशंकर, २०१०- अनामिका वीरमणी, २०११ सुकन्या रॉय, २०१२- स्रिग्धा नंदीपती २०१३ अरविंद महांकाली असे विजयी उमेदवार आहेत. (वृत्तसंस्था) यावर्षी आठ देशातील २८१ स्पर्धक स्पर्धेत उतरले होते. अंतिम फेरीत आलेल्या १२ स्पर्धकात सहा भारतीय मुले होती. श्रीराम, अन्सून, गोकुळ यांच्याखेरीज तेजस मुथुस्वामी (११-व्हर्जिनिया) नेहा कोंकलिया (१४- कॅलिफोर्निया) अश्विन वीरमणी (१४- ओहिओ) यांनी स्पर्धेत भाग घेतला.
स्पेलिंग बी स्पर्धेत भारतीय वंशाच्या मुलांनी इतिहास घडवला
By admin | Published: May 31, 2014 6:08 AM