सिंगापूरमधील एका न्यालायलयाने २६ वर्षीय भारतील नागरिकाला २०१९ मध्ये झालेल्या एका बलात्काराच्या प्रकरणात १६ वर्षांचा तुरुंगवास आणि १२ फटके मारण्याची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने अपहरण आणि चोरीचे आरोपही विचारात घेत शिक्षा सुनावली आहे. याबाबत वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार सफाई कर्मचारी असलेल्या चिन्नैया याने विद्यापीठातील एका विद्यार्थिनीचा ती रात्री उशिरा बस स्टँडकडे जात असताना पाठलाग केला. त्यानंतर तिच्यावर वार करून तिला फरफटत जंगलामध्ये घेऊन गेला. तसेच तिच्यावर बलात्कार केला.
पीडितेच्या चेहऱ्यावर आणि शरीराच्या अन्य भागांवर मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या होत्या. तिची एवढी वाईट अवस्था झाली होती की, तिला तिचा प्रियकरही ओळखू शकला नव्हता. ही घटना ४ मे २०१९ रोजी घडली होती. कोर्टाला या प्रकरणाची सुनावणी करण्यास ५ वर्षांचा अवधी लागला होता. चिन्नैया याच्या मानसिक आजारावर उपचार सुरू होते.
याबाबत डीपीपी काय पिल्ले यांनी सांगितले की, बलात्कार केल्यानंतर चिन्नैया पीडितेचं सामानही आपल्यासोबत घेऊन गेला होता. पीडितेला तिचा मोबाईल कसाबसा सापडला. त्यानंतर तिने तिच्या प्रियकराला फोन केला. तसेच पोलिसांना याची माहिती देण्यास सांगितले. पोलिसांनी पीडितेला रुग्णालयात दाखल केले. तसेच चिन्नैया याला ५ मे रोजी अटक करण्यात आली.