न्यूयॉर्क : अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या येसोमाईट नॅशनल पार्कमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या एका भारतीय दाम्पत्याचा दरीत कोसळून मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. तेथील टाफ्ट पॉइंटवरून हे दाम्पत्य ८०० फूट खोल दरीत कोसळले.ही दुर्घटना काही आठवड्यांपूर्वी घडली असली तरी त्यांचे मृतदेह सोमवारी बाहेर काढण्यात आले. विष्णू विश्वनाथ व मीनाक्षी मूर्ती, अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांना पर्यटनाची अतिशय आवड होती आणि आपल्या पर्यटनावर ते ‘हॉलिडेज अॅण्ड हॅप्पीली अवर्स’ नावाचा ब्लॉगही नियमितपणे लिहित असत. विष्णू विश्वनाथ हे सिस्को कंपनीत इंजिनिअर होते. ते नक्की कधी पडले हे समजले नसले तरी गुरुवारी त्यांचे मृतदेह लष्करी जवानांना दिसले. त्यांनी नॅशनल पार्कच्या प्रमुखांना त्याची माहिती दिल्यानंतर ते बाहेर काढण्यात आले. यादाम्पत्याने तामिळनाडूच्या चेंगनूरच्या महाविद्यालयातून कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंग पूर्ण केले होते.
भारतीय दाम्पत्याचा अमेरिकेत खोल दरीमध्ये कोसळून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 3:03 AM