इस्लामाबाद: पाकिस्तानभारतीय सीमेपासून कर्तारपूरमधील गुरुद्वारा दरबार साहिबपर्यंत तर भारत गुरदासपूरमधील डेरा बाबा नानकपासून सीमेपर्यंत कॉरिडॉर बांधण्यात आला आहे. गुरुनानक यांच्या ५५० व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर येत्या 9 नोव्हेंबरमध्ये हा कॉरिडॉर सुरू होणार आहे. कॅारिडॅारच्या उद्घाटनाच्या दिवशी भारतीय भाविकांकडून कोणतेही पैसे आकारण्यात येणार नसल्याची माहिती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
इम्रान खान यांनी सांगितले की, भारतातून कर्तारपूरमध्ये येणाऱ्या शीख भाविकांसाठी परवान्याची आवश्यकता लागणार नसून फक्त ओळखपत्र सोबत असणं आवश्यक असणार आहे. तसेच भाविकांना दहा दिवसआधी नोंदणी करण्याची देखील आवश्यकता नसल्याचे इम्रान खान यांनी सांगितले आहे.
पाकिस्तान भारतीय सीमेपासून कर्तारपूरमधील गुरुद्वारा दरबार साहिबपर्यंत तर भारत गुरदासपूरमधील डेरा बाबा नानकपासून सीमेपर्यंत कॉरिडॉर बांधणार आहे. गुरु नानक यांच्या ५५० व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर येत्या नोव्हेंबरमध्ये हा कॉरिडॉर सुरू होणार आहे. या कॉरिडॉर मार्गे पाकिस्तानातील दरबार साहिब येथे दररोज ५ हजार शीख भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येणार असून यासाठी भाविकांना 1400 रुपये मोजावे लागणार आहे. मात्र भारताने भारतीय भाविकांकडून कोणतेही रुपये न आकरण्याची मागणी पाकिस्तानकडे केली आहे.