शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
4
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
5
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
6
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
7
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
8
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
9
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
10
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
11
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
12
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
13
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
14
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
15
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
16
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
17
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
18
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
19
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
20
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम

मुलगा रडत असल्याने भारतीय परिवाराला विमानातून उतरवले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2018 12:00 PM

ब्रिटनमध्ये रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या संयुक्त सचिवावर वर्णद्वेषी टिप्पणी

नवी दिल्ली : रस्ते वाहतूक मंत्रालयातील अधिकाऱ्याला लंडनमध्ये त्याचे मुल रडत असल्याचा कारणावरून वर्णभेदी टिप्पणीसह घाणेरड्या शब्दांत बोलत विमानातून उतरवण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. या अधिकाऱ्याने मंत्रालयाकडे याची तक्रारही केली आहे.  संयुक्त सचिव पदावर असलेला हा अधिकारी आपल्या तीन वर्षांच्या मुलासह ब्रिटिश एयरवेजच्या लंडन-बर्लिन या विमानातून प्रवास करत होता. तेव्हा त्यांचा मुलगा रडायला लागला. यावेळी या अधिकाऱ्याची पत्नी मुलाला शांत करत असताना विमानातील कर्मचाऱ्याने त्यांच्या जागेवर येत वर्णद्वेषी टिपण्णी केली. तसेच अभद्र भाषेमध्ये बोलत विमानातून उतरवल्याचा आरोप या अधिकाऱ्याने केला आहे. याचबरोबर मुलाला शांत करण्यासाठी मदत करणाऱ्या अन्य भारतीय प्रवाशांनाही खाली उतरविण्यात आले.  अधिकाऱ्याने या घटनेची तक्रार रस्ते वाहतूक मंत्रालयाबरोबरच उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली आहे. पत्रामध्ये या अधिकाऱ्याने म्हटले आहे की, मुलाला सीटबेल्ट बांधल्याने तो रडायला लागला. पत्नी त्याला समजावत होती. यावेळी काही कर्मचारी तेथे पोहोचले आणि मोठ्या आवाजात ओरडू लागले. यामुळे मुलगा आणखी घाबरला. दरम्यान, विमान कर्मचाऱ्यांनी विमान रनवे वर असताना इतर सहकाऱ्यांना मेसेज करायला सुरुवात केली. तसेच मुलाला खिडकीतून बाहेर फेकण्याची धमकी दिली. याबरोबरच घाणेरड्या शब्दांत वर्णभेदी टिपण्णी केली. दरम्यान, ब्रिटिश एयरवेजच्या प्रवक्त्याने सांगितले की, अशा प्रकारच्या आरोपांना कंपनीने गंभीरतेने घेतले आहे. प्रवाशांसोबतचा दुर्व्यवहार कधीही सहन केला जाणार नाही. या घटनेची चौकशी सुरु करण्यात आली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाIndiaभारतroad transportरस्ते वाहतूकEnglandइंग्लंड