वॉशिंग्टन : अमेरिकी अर्थव्यवस्थेच्या विकासात भारतीय आयटी कंपन्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले असल्याचे प्रतिपादन भारतीय उद्योग क्षेत्रातील आघाडीची संघटना नॅसकॉमने म्हटले आहे. अमेरिकेबाहेर नोकऱ्या देण्यास विरोध करणारे विधेयक अमेरिकी संसदेत दाखल झाले आहे; तसेच विदेशी नागरिकांना अमेरिकेत देण्यात येणाऱ्या नोकऱ्या रोखण्यासाठी एच-१बी व्हिसाच्या नियमात बदल करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर नॅसकॉमचे अध्यक्ष आर. चंद्रशेखर यांनी वरील वक्तव्य केले आहे. चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखालील एक पथक या आठवड्यात अमेरिकेत होते. भारतीय कंपन्यांची बाजू मांडण्यासाठी ते अमेरिकी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटले. उद्योग क्षेत्रातील तसेच मते बनविणाऱ्या अनेक जाणकारांच्याही त्यांनी भेटी घेतल्या. चंद्रशेखर यांनी सांगितले की, विदेशी लोकांनी अमेरिकी नागरिकांच्या नोकऱ्या पळविल्या असल्याची धारणा बनविली गेली आहे. त्यासाठी काही उदाहरणे आणि कहाण्या सांगितल्या जात आहेत. पण, वस्तुस्थिती खरेच तशी आहे का, हे तपासून पाहिले जात नाही. >आमचा वाटा मोठा2015 मध्ये ५ लाख नोकऱ्या भारतीय कंपन्यांनी अमेरिकेत निर्माण केल्या. या नोकऱ्यांत दरवर्षी १0 टक्क्यांची वाढ होत आहे. अमेरिकी उद्योग क्षेत्राला भारतीय कंपन्यांनी दिलेल्या सेवेमुळे मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. ‘फॉर्च्युन ५00’ कंपन्यांपैकी ७५ टक्के कंपन्यांना जागतिक पातळीवर स्पर्धात्मक आणि रोजगारक्षम करण्यात भारतीय आयटी कंपन्यांचा वाटा आहे.
अमेरिकेसाठी भारतीय आयटीचे मोठे योगदान
By admin | Published: March 04, 2017 4:21 AM