नवी दिल्ली :पाकिस्ताननेभारतीय दुतावासातील दोन कर्मचाऱ्यांना बंधक बनवून टॉर्चर केल्याचा प्रकार घडला आहे. सोमवारी सकाळी अपहरण करण्यात आलेल्या दोन कर्मचाऱ्यांना सायंकाळी उशिरा सोडण्यात आले. पाकिस्तानने त्यांच्यासोबत अत्यंत क्रूर व्यवहार केला आहे. त्यांना काही माहितीसाठी जवळपास 12 तास ताब्यात ठेवून प्रचंड मारहाण केली गेली. या दोघांनी जेव्हा पाणी मागीतले तेव्हा हल्लेखोरांनी त्यांना अत्यंत घाणेरडे पाणी दिले. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या दोघांनाही त्यांची भूमिका आणि हाय कमिशच्या सर्व कर्मचाऱ्यांची माहिती विचारण्यात आली.
चीनची भीती की चिथावणी? नेपाळ उचलतोय मोठं पाऊल; आता थेट अमेरिकेलाच देणार 'तगडा' झटका!
नियोजनबद्ध पद्धतीने केले गेले अपहरण -सोमवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास, दोन कर्मचाऱ्यांचे अपहरण करण्यात आले. त्यांना दुतावासाजवळ असलेल्या एका पेट्रोलपंपावरून उचलण्यात आले होते. सहा गाड्यांमध्ये 15 ते 16 लोक आले होते. ते शस्त्रसज्ज होते. यानंतर कर्मचाऱ्यांचे हात बांधून त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली. यानंतर त्यांना साधारणपणे 10 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या एका ठिकाणी नेण्यात आले. तेथे जवळपास 6 तास त्यांची चौकशी झाली. यादरम्यान त्यांना अनेकदा काठीने मारहाण करण्यात आली आणि घाणेरडे पाणीही देण्यात आले. या दोघांच्याही मानेवर, चेहऱ्यांवर आणि मांड्यांवर मारहाण केल्याच्या खुना आहेत.
खोटा गुन्हा दाखल -इस्लामाबाद पोलिसांनी या दोन्ही अधिकाऱ्यांना जाळ्यात घेण्याची पूर्ण तयारी केली होती. एचटीने एक एफआयआर बघितली आहे. यात दावा करण्यात आला आहे, की या दोघांच्या कारमधून 10,000 पाकिस्तानी रुपयांची बनावट करन्सी मिळाली आहे. पाकिस्तानी माध्यमांनी दावा केला आहे, की भारतीय कर्मचाऱ्यांची कार एका पादचाराला धडकली. म्हणून त्यांना अटक करण्यात आली. हे प्रकरण सेट करण्यासाठी अपहरणकर्त्यांनी या कर्मचाऱ्यांना आमच्याकडून अॅक्सीडेंट झाला, असे व्हिडिओवर बोलायलाही लावले आहे.
बदला घेण्यासाठी पाकिस्तानचा ड्रामा?आता हाय कमिशनच्या लोकांसोबत, असेच केले जाईल, अशी धमकी या दोघांनाही देण्यात आली. यानंतर त्यांना 9 वाजता भारतीय दूतावासाकडे सोपवण्यात आले. भारताने 31 मेरोजी पाकिस्ताच्या हायकमिशनच्या दोन कर्मचाऱ्यांना हेरगिरी करताना पकडले होते. यानंतर त्यांना 24 तासांच्या आत देश सोडायला लावले होते.
CoronaVirus News: 18 राज्यांतून येतेय 'खूश खबर'; पण, 'या' राज्यांमध्ये मात्र कोरोनाचा 'स्फोट'!