लंडन: अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासानं (NASA) काही दिवसांपूर्वीच रोबो पर्सिव्हिएरन्स रोवरला (Perseverance Rover) यशस्वीरित्या मंगळ ग्रहावर उतरवलं. आता हा रोबो मंगळ ग्रहावरील महत्त्वाची माहिती नासाला देईल. या मोहिमेवर नासाचे शेकडो शास्त्रज्ञ दिवसरात्र मेहनत घेत आहेत. यापैकी एका भारतीय शास्त्रज्ञाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. प्राध्यापक संजीव गुप्ता पर्सिव्हिएरन्स रोवरचं काम नासाच्या मुख्यालयात किंवा कार्यालयात बसून नव्हे, तर स्वत:च्या वन बीएचके फ्लॅटमधून करत आहेत. पर्सिव्हिएरन्स रोवरवर नियंत्रणात ठेवण्यासाठी गुप्ता यांनी दक्षिण लंडनमध्ये एक फ्लॅट भाड्यानं घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं हवाई वाहतूक बंद आहे. त्यामुळेच गुप्ता एका फ्लॅटमधून नासाच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेवर काम करत आहेत.मंगळावर अंतरिक्षयान उतरतानाचा व्हिडिओ नासाने केला जारीब्रिटनमध्ये राहणारे ५५ वर्षीय संजीव गुप्ता यांचं मूळ भारतात आहे. ते भूवैज्ञानिक आहेत. लंडनच्या इम्पिरियल महाविद्यालयात ते भूविज्ञान तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. नासानं मंगळ ग्रहाची माहिती गोळा करण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी मोहीम आखली आहे. २०२७ पर्यंत मंगळ ग्रहाची इत्यंभूत माहिती गोळा करून संशोधन करण्याचं काम नासातल्या शास्त्रज्ञांचं एक पथक करत आहे. याच पथकात गुप्ता यांचा समावेश आहे. मंगळावर जीवन आहे की नाही, याचा शोध या पथकाकडून घेतला जात आहे. पहिल्यांदाच! मंगळ ग्रहावरून NASA च्या रोवरने पाठवला पहिला व्हिडीओ, बघा लाल ग्रहाचा अद्भूत नजारा...नासाच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेवर काम करताना कॅलिफॉर्नियातल्या जेट प्रोपल्शन लॅबमध्ये उपस्थित राहण्याची गुप्ता यांची इच्छा होती. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे बंद असणारी हवाई वाहतूक यामुळे गुप्ता यांना कॅलिफॉर्नियाला जाता आलं नाही. मात्र तरीही त्यांचं काम थांबलेलं नाही. काम अविरतपणे सुरू राहावं आणि त्याचा कुटुंबाला त्रास होऊ नये यासाठी त्यांनी दक्षिण लंडनमध्ये एका सलूनच्या वर वन बीएचके फ्लॅट भाड्यानं घेतला आहे. याच फ्लॅटमधून ते पर्सिव्हिएरन्स रोवरच्या मोहिमेवर काम करत आहेत. या मोहिमेत सहभागी ४०० हून अधिक शास्त्रज्ञांचा सहभाग आहे. सध्या वाहतुकीवर निर्बंध असल्यानं यातले अनेक शास्त्रज्ञ घरातूनच काम करत आहेत.
भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाची बातच न्यारी; नासाचं 'मिशन मंगळ' 1 BHKमधून करताहेत कंट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2021 8:50 AM