दुबई : कुवैतमध्ये भारतीय परिचारिकांची भरती केवळ मान्यताप्राप्त सरकारी संस्थांमार्फतच केली जाते, अशी माहिती कुवैतमधील भारतीय दूतावासाने दिली.दूतावासाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मे २0१५ पासून परिचारिकांच्या भरतीसाठीचे हे बंधन घालण्यात आले आहे. कुवैतमधील खासगी रुग्णालयांनी याबाबत विचारणा केल्यानंतर ही माहिती जारी करण्यात आली आहे.दूतावासाने म्हटले की, मे २0१५ पासून भारत सरकारने कुवैतमध्ये भारतीय परिचारिकांची भरती करण्यासाठी काही मोजक्या सरकारच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त नोकरी भरती संस्थांना अधिकार दिले. परिचारिकांना अॅग्रीग्रेशन चेक रिक्वायर्ड (ईसीआर) व्यवस्थेत समाविष्ट करण्यात आले आहे. या व्यवस्थेत १८ देशांचा समावेश करण्यात आला आहे. या व्यवस्थेनुसार, ई-मायग्रेट सीस्टिमच्या माध्यमातून एमिग्रेशन क्लिअरन्स मिळाल्याशिवाय परिचारिकांना रोजगार देता येत नाही. १८ देशांच्या या यादीत कुवैतसह अफगाणिस्तान, बहारीन, इराक, इंडोनेशिया, सौदी अरेबिया, जॉर्डन, लिबिया, लेबनॉन, मलेशिया, ओमान, कतार, सुदान, सीरिया, थायलंड, यूएई आणि येमेन या देशांचा समावेश आहे. या सर्व देशांत भारतीय परिचारिकांना मान्यताप्राप्त सरकारी संस्थांमधून जावे लागते. (वृत्तसंस्था)अनेक संस्थांमार्फत होते नेमणूकई-मायग्रेट सीस्टिमद्वारे होणारी भरती प्रक्रिया अत्यंत सोपी, पारदर्शक आणि वापरानुकूल आहे. परिचारिकांची भरती करू इच्छिणाऱ्या कुवैतमधील संस्थांना ई-मायग्रेशन सीस्टिममध्ये स्वत:ची नोंदणी करावी लागते. दूतावासाच्या परिसरात त्यासाठी एक मदत कक्ष आहे. भारतात सहा सरकारी संस्थांना परिचारिकांच्या भरतीचे अधिकार देण्यात आले आहे. थिरुवनंतपुरमध्ये नोरका-रुट सेंटर आणि ओव्हरसीज डेव्हलपमेंट अँड एम्प्लॉयमेंट प्रमोशन कन्सल्टंट, चेन्नईत ओव्हरसीज मॅनपॉवर कॉर्पोरेशन, कानपूरमध्ये युपी फायनान्शिअल कॉर्पोरेशन, हैदराबादेत तेलंगणान ओव्हरसीज मॅनपॉवर कंपनी आणि विजयवाडा येथे ओव्हरसीज मॅनपॉवर कंपनी आॅफ आंध्र प्रदेश यांचा त्यात समावेश आहे.
कुवैतमध्ये सरकारी संस्थांमार्फतच होते भारतीय परिचारिकांची भरती
By admin | Published: April 11, 2017 4:29 AM