शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

लंडनमध्ये खलिस्तानवाद्यांचा तीव्र विरोध; शेकडो भारतीय एकवटले, 'जय हिंद'च्या घोषणांनी परिसर दुमदुमला...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 9:08 PM

रविवारी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात खलिस्तानवाद्यांनी हल्ला करत तिरंगा हटवला होता.

रविवारी लंडनमधीलभारतीय उच्चायुक्तालयावर खलिस्तानवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर तेथील भारतीय एकवटले आहेत. आज(मंगळवार) शेकडो भारतीय नागरिक (शिखांसह) भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर जमले आणि एकतेचा संदेश दिला. यावेळी भारत माता की जय आणि जय हिंदच्या घोषणा देण्यात आल्या. स्लमडॉग मिलेनियर या भारतीय चित्रपटातील 'जय हो' या ऑस्कर विजेत्या गाण्यावर आंदोलक नाचताना दिसले. यावेळी पोलीसही गाण्यावर थिरकले.

खलिस्तान्यांकडून पराभव मान्य नाहीरविवारी खलिस्तानवाद्यांनी तोडफोड करुन तिरंगा उतरवण्यात आल्याची घटना घडली होती. यानंतर उच्चायुक्तालयावर मोठा तिरंगा लावण्यात आला. मंगळवारी शेकडो भारतीय तिथे जमले आणि त्यांनी एकतेचा संदेश दिला. मंगळवारी खलिस्तानींच्या कृतीचा निषेध करण्यासाठी जमलेल्या लोकांपैकी एक म्हणाला – काही लोक भारत आणि येथील शांततेचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. या लोकांना उत्तर द्यायला हवे. 

दिल्लीत पंजाबी एकवटलेलंडनमधील घटनेविरोधात शिखांनी सोमवारी नवी दिल्लीतील ब्रिटीश उच्चायुक्तालयाबाहेर बॅनर आणि पोस्टर लावले. यावेळी त्यांनी खलिस्तानींच्या विरोधात घोषणाबाजी केली. भारत हा आमचा स्वाभिमान आहे. तिरंग्याचा अपमान कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असे यावेळी ते म्हणाले. निदर्शनात सहभागी असलेला एक तरुण शीख म्हणाला - लंडनमध्ये जे घडले, त्याचे उत्तर देण्यासाठी आम्ही आलो आहोत. आम्ही हजारो शीख आपापले काम सोडून इथे आलो आहोत, हे सांगण्यासाठी की आम्ही आमच्या तिरंग्याचा अनादर सहन करणार नाही. 

लंडनमध्ये नेमकं काय झालं? पंजाब पोलीस खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगवर कारवाई करत आहेत. त्याविरोधात रविवारी लंडनमध्ये खलिस्तान समर्थकांनी याला विरोध केला. खलिस्तानी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात पोहोचले. आधी तोडफोड केली आणि नंतर येथे लावलेला तिरंगा काढून टाकला. त्या लोकांच्या हातात खलिस्तानी ध्वज आणि अमृतपाल सिंग याचे पोस्टर होते. पोस्टर्सवर 'फ्री अमृतपाल सिंग', 'आम्हाला न्याय पाहिजे' आणि 'आम्ही अमृतपाल सिंग याच्यासोबत आहोत' असे लिहिले होते. यावर भारताने तीव्र आक्षेप नोंदवला. 

टॅग्स :IndiaभारतLondonलंडनsikhशीखInternationalआंतरराष्ट्रीय