वॉशिंग्टन : अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना स्वत:च्या सुरक्षेची काळजी वाटत असल्याचे सर्व्हेतून समोर आले आहे. अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी येणारे दहा लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी देशाच्या अर्थव्यवस्थेत ३६ बिलियन डॉलर्सची भर घालतात. दि इन्स्टिट्यूट आॅफ इंटरनॅशनल एज्युकेशन (आयआयई) ची स्थापना १९१९ मध्ये झाली असून शांतीपूर्ण आणि न्यायसंगत समाज बनविण्यासाठी ही संस्था प्रयत्न करते. आयआयईने म्हटले आहे की, मध्यपूर्व आणि भारतासाठी या सर्व्हेतील निष्कर्ष काळजीचा विषय आहे. तीस टक्के संस्थांना काळजी आहे की, मध्य पूर्वेतील विद्यार्थ्यांनी प्रवेशाचा प्रस्ताव तर स्वीकारला असला तरी या परिसरात येत नाहीत. वीस टक्के संस्थांना भारतीय विद्यार्थी परिसरात येऊ शकणार नाहीत, अशी काळजी वाटत आहे. आयआयईच्या सर्व्हेक्षणानुसार, भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेतील अध्ययनाबाबत तीव्र चिंता आहे. भारतीय विद्यार्थ्यांसाठी स्वत:ची सुरक्षा हा चिंतेचा विषय आहे, अशी प्रतिक्रिया ८० टक्के संस्थांनी दिली आहे. यामुळे अमेरिकेत उच्च शिक्षण घेणाऱ्या दुसऱ्या सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय गटाच्या स्वरूपात भारतीय विद्यार्थी वाढू शकणार नाहीत. भारतीय विद्यार्थी अन्य देशांचे प्रवेशांचे प्रस्ताव स्वीकाण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील ११२ कॉलेजांचा डेटा उपलब्ध झाला असून, त्यातून त्यांच्या अपेक्षित उत्पन्न दरात दोन टक्के घट झाल्याचे दिसते. आंतरराष्ट्रीय अंडरग्रॅज्युएटच्या उत्पन्नात २०१६ च्या २६ टक्क्यांच्या तुलनेत २०१७ मध्ये २४ टक्के एवढी घट झाली आहे. या सर्व्हेनुसार, युरोप आणि कॅनडातील विद्यार्थ्यांबाबत अशी भीती वाटत नाही. (वृत्तसंस्था)अन्य पर्याय आहेत : भारतातून उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. मात्र, अलिकडच्या काळात या विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षितता वाढली आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर व्हिसा देणाऱ्या अन्य देशांचा पर्याय भारतीय विद्यार्थी स्वीकारु शकतात, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षेची काळजी
By admin | Published: July 16, 2017 1:45 AM