भारतीय पर्यटकांना बळजबरीने, रशियाच्या लष्करात दाखल केले; भारतात परतण्यासाठी मदतीचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 08:54 AM2024-03-07T08:54:16+5:302024-03-07T08:54:55+5:30
या सात जणांनी म्हटले आहे की, आम्हाला फसवणुकीने रशियाच्या वॅगनर ग्रुप या खासगी लष्करात सामील करण्यात आले.
नवी दिल्ली : पंजाबमधील होशियारपूर येथे राहाणारे सात जण रशियामध्ये पर्यटनासाठी गेले असताना त्यांना बळजबरीने तेथील वॅगनर ग्रुप या खासगी लष्करामध्ये भरती करून त्यांना युक्रेनविरोधात लढण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. तसा दावा करणारा एक व्हिडीओ या सात जणांनी तयार केला आहे. आम्हाला भारतात परतण्यासाठी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
या सात जणांनी म्हटले आहे की, आम्हाला फसवणुकीने रशियाच्या वॅगनर ग्रुप या खासगी लष्करात सामील करण्यात आले. त्यानंतर युक्रेनविरोधात लढण्यासाठी लष्करी प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर बळजबरीने युद्ध आघाडीवर लढण्यासाठी पाठविले जात आहे. या सात जणांनी तयार केलेला १०५ सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये ते सात जण कशा हलाखीच्या स्थितीत राहत आहेत हे दिसते. एका अस्वच्छ खोलीत हे सात जण उभे असून त्यांच्यातील गगनदीप सिंग हा आपली कर्मकहाणी व्हिडीओत सांगत आहे. अन्य सहा जण एका कोपऱ्यात उभे आहेत.
गगनदीप सिंहने सांगितले की, नववर्ष सोहळा साजरा करण्यासाठी आम्ही रशियामध्ये आलो होतो. आम्हाला बेलारूसच्या पोलिसांनी पकडून लष्कराच्या हवाली केले.
मागे राहिली मुलगी आणि गर्भवती पत्नी
इस्रायलमध्ये झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निबीन मॅक्सवेल (३१) हे दोन महिन्यांपूर्वीच इस्रायलला गेले होते. त्यांना साडेचार वर्षांची मुलगी आणि सात महिन्यांची गर्भवती पत्नी आहे.
निबीन यांच्या कुटुंबावर सध्या शोककळा पसरली आहे. निबीन यांच्या वडिलांनी सांगितले की, प्रथम मोठा मुलगा इस्रायलला गेला होता. त्यानंतर, एका आठवड्याने लहान मुलगाही गेला होता.'''
१० वर्षे तुरुंगात टाकण्याची धमकी
- बेलारुसमध्ये या सात जणांना पकडल्यानंतर त्यांच्याकडून काही कागदपत्रांवर सह्या घेण्यात आल्या.
- त्यानंतर त्यांना सांगण्यात आले आहे की, एक तर रशियाच्या सैन्यात सामील व्हा अन्यथा तुम्हाला १० वर्षे तुरुंगवास भोगावा लागेल.
- त्यानंतर हे सातही जण नाईलाजाने वॅगनर ग्रुप या रशियाच्या खासगी लष्करात दाखल झाले.