बीजिंग: मोदी सरकारनं चिनी अॅप्सवर बंदी घालल्यानंतर चीननेसुद्धा भारतीय वृत्तवाहिन्या आणि माध्यमसमूहांशी संबंधित सर्व वेबसाइट बॅन केल्या आहेत. चीनमध्ये भारतीय संकेतस्थळ किंवा थेट भारतीय टीव्ही पाहण्याची सुविधा आता फक्त आभासी खासगी नेटवर्क(व्हीपीएन)द्वारे मिळू शकते, पण गेल्या दोन दिवसांपासून व्हीपीएनची सुविधाही चीनमध्ये खंडित करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीजिंगच्या आदेशावरून भारतीय वृत्त वेबसाइटवर बंदी घालण्यात आली आहे.बीजिंगमधील मुत्सद्दी सूत्रानुसार आता भारतीय टीव्ही चॅनेल्स केवळ आयपी टीव्हीच्या माध्यमातून पाहता येतील. एक्सप्रेस व्हीपीएन हे गेल्या दोन दिवसांपासून चीनमधील आयफोन आणि डेस्कटॉपवरही काम करत नाही. व्हीपीएनद्वारे सेन्सॉर केलेल्या वेबसाइट उघडणं शक्य नाही. चीननं भारतीय वेबसाइट रोखण्यासाठी एक प्रगत फायरवॉलही बनविला आहे, जो व्हीपीएनलाही रोखण्यास सक्षम आहे. या माध्यमातून चीन केवळ भारतीय वेबसाइट्सच ब्लॉक करत नाही, तर बीबीसी आणि सीएनएनच्या बातम्यांचे फिल्टरही करीत आहे. हाँगकाँगच्या कामगिरीशी संबंधित कोणतीही कथा या साइटवर येताच स्वयंचलितपणे ब्लॅकआऊट होते आणि बातमी हटवल्यानंतर ती वेबसाइट पुन्हा दिसू लागते.अॅप्सवर भारताने बंदी घातली, चीन घेतोय बदलालडाखच्या गलवान खो-यात भारत-चीन सैन्य दलादरम्यान झालेल्या हिंसक संघर्षानंतर दोन्ही देशांमधील तणाव कायम आहे. सोमवारी मोदी सरकारने वापरकर्त्यांच्या डेटा सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत 59 चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे. चिनी अॅप्लिकेशन्सचे सर्व्हर भारताबाहेर अस्तित्त्वात आहेत आणि त्यांच्यामार्फत वापरकर्त्यांचा डेटा चोरीला जात असल्याचा युक्तिवाद भारताने केला आहे. चिनी सरकारी माध्यमांनी भारताच्या या निर्णयाचे अमेरिकेची नक्कल केल्याचे वर्णन केले आहे. या अॅप्समध्ये टिकटॉक, यूसी ब्राउझर, हॅलोसारख्या बर्याच लोकप्रिय अॅप्सचा समावेश आहे.
चीनने भारताला दिला इशारा दुसरीकडे चीनच्या अधिकृत वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने असा इशारा दिला आहे की, अॅप्सवर बंदी घालण्याचा भारताचा निर्णय त्यांच्यासाठी हानिकारक ठरेल. त्यांच्यामते, यामुळे केवळ भारताच्या तंत्रज्ञानाचा विकास खंडित होणार नाही, तर भारतीय कंपन्यांमधील चीनच्या गुंतवणुकीवरही त्याचा मोठा परिणाम होईल. चीनने भारताचा आरोप फेटाळून लावला, ज्यामध्ये चिनी कंपन्यांकडून भारतीय वापरकर्त्यांकडून डेटा चोरल्याचा आरोप होता.
हेही वाचा
चिनी अॅपवर बंदी घालणं योग्यच, पण टिक-टॉकवरील बंदीमुळे...; संजय निरुपम यांची वेगळीच खंत
देशभरात चिनी अॅप्स बंद करण्यासाठी आता दूरसंचार कंपन्या उचलणार मोठं पाऊल!
चीनचे ५९ अॅप बंद केल्यानं काय बदलणार अन् भारताला कसं नुकसान होणार?, जाणून घ्या...
पाणबुडीनंतर घुसखोरी करणारं चिनी बॉम्बर विमान जपाननं लावलं पळवून; चीननं दिली धमकी
CoronaVirus: कोरोनाची तीन नवीन लक्षणं आली समोर, CDCने अपडेट केली यादी
आपल्याला चीनशी लढायचे आहे, सरकारच्या विरोधकांशी नाही; शिवसेनेचा टोला
आजचे राशीभविष्य - 30 जून 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना आज अचानक धनाचा लाभ होणार
बंपर भरती! 'या' कंपन्या भारतात देणार ४० हजारांहून जास्त रोजगार, जाणून घ्या...