Turkey Syria News: तुर्कस्तान आणि सीरियातीलभूकंपामुळे मोठी वित्त आणि जीवितहानी झाली आहे. तेथील प्रभावित लोकांच्या मदतीसाठी भारताने आपली बचाव आणि वैद्यकीय पथके रवाना केली आहेत. यातच पीडित लोकांना वाचवणाऱ्या एका भारतीय महिला सैनिकाचा फोटो सध्या जगभरात व्हायरल होत आहे. हा फोटो तुर्कस्तानच्या इस्केंडरुन शहरातील आर्मी फील्ड हॉस्पिटलमधील आहे. फोटोत भारतीय महिला अधिकाऱ्याला पीडित महिला मिठी मारताना दिसत आहे.
भारतीय लष्कराने हा फोटो शेअर केला असून कॅप्शन लिहिले की, 'आम्हाला काळजी आहे.' भूकंपानंतर मदतकार्यासाठी भारताने ऑपरेशन दोस्त अंतर्गत भारतीय लष्कर आणि एनडीआरएफची पथके तुर्कीमध्ये पाठवली आहेत. इथे एनडीआरएफकडून ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांचा बचाव, तर भारतीय लष्कराकडून वैद्यकीय मदत पुरवली जात आहे.
भारताची मदतभारताने ऑपरेशन दोस्त अंतर्गत 2 NDRF टीम, डॉक्टर आणि मदत सामग्रीसह भारतीय हवाई दलाचे C-17 विमान पाठवले आहे. तिथे भारतीय लष्कराने 30 तात्पुरती रुग्णालये बांधून लोकांवर उपचार सुरू केले आहेत. भारतासोबतच अमेरिका, रशिया, ब्रिटन आणि इस्रायलसह अनेक देश तुर्की आणि सीरियात बचाव कार्यासाठी पुढे आले आहेत.