कतारमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय कामगार आहेत. त्यांच्या अनेक समस्या ऐकून घेण्यासाठी मोदी यांनी या कामगारांची खास भेट घेतली. काही काळ ते त्यांच्यात रमलेही. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून काही ठिकाणी वेतन मिळत नसल्याच्या तक्रारी कामगारांनी केल्या.कतारच्या अमीरशी भेट : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे अमीर शेख तामित बिन हमाद अल थानी यांनी रविवारी येथे विविध विषयांवर चर्चा केली. अमीर यांचा दोन दिवसांपूर्वीच ३६ वा वाढदिवस झाला. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. मोदी यांचे येथे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी फोटोसह टिष्ट्वट केले आहे की, 'अरबी पद्धतीने शानदार स्वागत. पंतप्रधानांचे दोहाच्या अमिरी दिवानमध्ये पारंपरिक स्वागत. 'दोन्ही नेत्यांत चर्चेत ऊर्जा क्षेत्रात सहकार्य हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. सात करारांवर स्वाक्षऱ्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कतार दौऱ्यात उभय देशात सात महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. आर्थिक गुप्त माहितीचे आदान प्रदान करणे, दहशतवाद्यांची आर्थिक रसद रोखणे आणि गॅसने समृद्ध असलेल्या खाडीच्या देशातून विदेशी गुंतवणूक आकर्षित करणे यासह सात महत्वपूर्ण करारांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. कौशल्य विकास आणि शिक्षण, आरोग्य, पर्यटन आणि खेळ या क्षेत्रात सहकार्य आणि गुंतवणूक या करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या.
कतारमधील भारतीय कामगारांची पंतप्रधान मोदींशी चर्चा
By admin | Published: June 06, 2016 1:58 AM