शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

इसिसच्या नव्या व्हिडिओत भारतीय तरुण

By admin | Published: July 21, 2015 10:40 PM

इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरियात (इसिस) दाखल झालेल्या भारतीयांवर लक्ष ठेवून असलेल्या सुरक्षा यंत्रणा इसिसमध्ये भरती झालेल्यांच्या

मुंबई : इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरियात (इसिस) दाखल झालेल्या भारतीयांवर लक्ष ठेवून असलेल्या सुरक्षा यंत्रणा इसिसमध्ये भरती झालेल्यांच्या हातात रायफली असल्याची छायाचित्रे सोमवारी प्रसिद्ध होताच कारवायांसाठी सरसावल्या. ही छायाचित्रे टिष्ट्वटर हँडल @ू्रँंू्रि2 या नावाने मॅग्नेट गॅसने पोस्ट केली होती. हे टिष्ट्वटर अकाऊंट फहाद शेख याने हाताळल्याचे समजले जाते. कल्याणचा हा तरूण फहाद शेख गेल्या वर्षी जे चार जण इसिसमध्ये गेले होते त्यापैकी एक आहे. त्याआधी दोन डझनपेक्षा जास्त मॅग्नेटगॅस नावाने तयार झालेले व अनेक आकड्यांची त्याला जोड दिलेले अकाऊंटस् टिष्ट्वटरने बंद केले होते.धक्कादायक बाब अशी की फहादने जे टिष्ट्वटस् केले त्यापैकी एकामध्ये मोहम्मद साजिद उर्फ बाबा साजिद हा इंडियन मुजाहिदनचा माजी कार्यकर्ताही गेल्यावर्षी इसिसमध्ये दाखल झाल्याचे म्हटले होते. गेल्या महिन्यात साजिद सिरियामध्ये ठार झाल्याचे सांगितले जाते. २००८ मध्ये देशात झालेल्या बाँबस्फोटांची चौकशी करीत असलेल्या नॅशनल इनव्हेस्टिगेशन एजन्सीने (एनआयए) साजिदची अटक होण्यास मदत होईल अशी माहिती देण्याऱ्यास १० लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते.@ू्रँंू्रि2 हे कव्हर म्हणून आयएसचा लोगो वापरते. त्यावरून झालेले टिष्ट्वट म्हणते की,‘मुशरीकिनच्या हातातून संपूर्ण भारत जिंकून घेतला जात नाही तोपर्यंत ही बोट थांबविली जाऊ शकणार नाही. आणि आम्ही ती सतत भरलेली असावी या साठी तुम्हाला निमंत्रित करीत आहोत.’’या टिष्ट्वटसोबत प्रसिद्ध टाकण्यात आलेल्या छायाचित्रांत दोन बोटींमध्ये डझनभर लोक त्यांच्या हातांतील शस्त्रे फिरवत असल्याचे दिसते. दुसऱ्या एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, ‘त्यांच्यामध्ये असलेला एक जण इंडियन मुजाहिदीनच्या गटाचा माजी सिंहासारखा नेता असून तो इगेमसी इन कोबाने (अबू तुराब अल हिंदी) आहे. अबू तुराब अल हिंदी ही पदवी बाबा साजिद याला तो इसिसमध्ये दाखल झाल्यावर देण्यात आली होती. (इगेमसीचा अर्थ मृत्यू येईपर्यंत लढणारा) संघर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत तो माघारी येणार नाही.फहादने १९ जुलै रोजी केलेल्या टिष्ट्वटमध्ये म्हटले होते की, इसिसचा भारतातून आलेला अतिरेकी अबु काका असल्याचे छायाचित्र टाकले होते. त्याने टिष्ट्वटमध्ये म्हटले होते की, अबु काका अल हिंदी हा भारतीय मुजाहीद आहे. गुप्तचर अधिकाऱ्याने सांगितले की आम्ही टिष्ट्वटर हँडलवर आमचे लक्ष असून ते बंद करण्याची आम्ही विनंती करणार आहोत.इसिसमध्ये सत्तेचे वाटप वॉशिंग्टन : इसिस वा इस्लामिक स्टेटस्चा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी याने आपल्या हाती एकवटलेल्या सत्तेचे विकेंद्रीकरण आपल्या अंतर्गत वर्तुळात केले असून, बगदादी स्वत: वा कोणताही ज्येष्ठ नेता मरण पावला तरीही इसिसच्या लढ्यात कोणताही बदल होऊ नये अशी इच्छा त्याने व्यक्त केली आहे. (वृत्तसंस्था)