वॉशिंग्टन : अमेरिकी नागरिकांची फसवणूक करणे आणि त्यांच्याकडून ३० कोटी डॉलर चोरल्याचा आरोप भारताच्या पाच कॉल सेंटरवर ठेवण्यात आला. अमेरिकेचे गृह सुरक्षा सचिव जेह जॉनसन यांनी ही माहिती दिली. जॉनसन यांनी सांगितले की, सर्व पाच कॉल सेंटरवर व ५६ नागरिकांवर आरोपपत्र निश्चित करण्यात आले आहे. यातील ३१ जण भारतीय आहेत. याशिवाय अमेरिकेत २० जणांना अटक करण्यात आली आहे. यातील बहुतांश भारतीय आहेत. ३० कोटी डॉलरची फसवूणक केल्याचा आरोप या आरोपींवर आहे. अहमदाबादच्या कॉल सेंटरच्या नेटवर्कमधून अमेरिकेतील गृह विभाग, अंतर्गत महसूल विभाग किंवा अन्य सरकारी अधिकारी असल्याचे सांगत फोन केला जात असे. खोटे अटक वॉरंट व जमा न केलेल्या आयकराच्या नावावर पेमेंट करण्याची मागणी केली जात होती. अहमदाबादच्या ज्या पाच कॉल सेंटरने हे कॉल केले त्यात एच ग्लोबल, कॉल मंत्रा, वर्ल्डवाईड सोल्युशन, जोरियान कम्युनिकेशन्स आणि शर्मा बीपीओ सर्व्हिसेस यांचा सहभाग आहे. (वृत्तसंस्था)१८ लाख नागरिकांना आले फसवणुकीचे कॉल्सट्रेझरी इन्स्पेक्टर जनरल फॉर टॅक्स अॅडमिनिस्ट्रेशन (टीआयजीटीए) या कार्यालयाला आतापर्यंत १८ लाख नागरिकांनी सांगितले आहे की, त्यांना असे फसवणुकीचे कॉल आले होते, तर ९६०० पेक्षा अधिक नागरिकांनी सांगितले आहे की, त्यांची या माध्यमातून ५ कोटी डॉलरची फसवणूक झाली आहे. कॅलिफोर्नियातील एका व्यक्तीची तर १ लाख ३६ हजार डॉलर एवढ्या रकमेची फसवणूक झाली आहे.
भारतीय कॉल सेंटर्सकडून अमेरिकनांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2016 2:37 AM