दुबई: ‘दुबई रॅफेल ड्रॉ’ या लॉटरीचे पहिल्या क्रमांकाचे जॅकपॉट बक्षीस जिंकल्याने तेथे नोकरी करणारा हरिकृष्णनव्ही. नायर हा भारतीय एका रात्रीत कोट्यधीश झाला. नायर यांना बक्षिसापोटी १३ दशलक्ष संयुक्त अरब अमिरातीचे दिरहम (सुमारे २०.६७ कोटी रुपये) एवढी रक्कम मिळाली.आबुधाबी आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी या लॉटरीची सोडत काढण्यात आली. ‘दि बिग टिकेट ड्रीम १२’ या मालिकेतील या लॉटरीच्या तिकिटांची विक्री डिसेंबरमध्ये केली गेली होती.या लॉटरीची तिकिटे आॅनलाइन किंवा विमानतळांवर खरेदी करण्याची सोय होती. ५०० दिरहमचे एक तिकीट घेतल्यास, त्यावर आणखी एक तिकीट मोफत दिले जात होते. नायर यांचे नशीब एवढे बलवत्तर की, त्यांना अशा मोफत मिळालेल्या तिकिटावर हे जॅकपॉटचे बक्षीस लागले.एवढे मोठे बक्षीस लागल्याचे समजल्यावर त्यांची पहिली प्रतिक्रिया अविश्वासाची व नंतर आनंदाची होती! एकटे नायरच नव्हेत, तर इतर चार भारतीयांनाही या लॉटरीने साथ दिली. त्यात एका लहान मुलाचाही समावेश आहे. (वृत्तसंस्था)
दुबईतील भारतीय झाला एका रात्रीत कोट्यधीश! लॉटरीचे २६ कोटींचे बक्षीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 6:31 AM