वॉशिंग्टन : अमेरिकी अध्यक्षपद निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदाच भारतावर टिपणी केली. त्या देशाचे (भारत) उत्तम सुरू आहे; परंतु कोणीही त्याबाबत बोलत नाही, असे ट्रम्प म्हणाले. सीएनएनला सोमवारी दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, ‘भारताचे उत्तम सुरू आहे.’अध्यक्षपदाच्या स्पर्धेत उतरल्यानंतर ट्रम्प यांनी पहिल्यांदाच भारताविषयीचे विचार व्यक्त केले. ट्रम्प म्हणाले की, भारत व चीनने सोबतच सुरुवात केली. भारताचे चांगले सुरू आहे. तथापि, याबाबत कोणी बोलत नाही. अमेरिकेतील रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात भारतात जात आहेत, तरीही मी म्हणेन की भारताचे चांगले सुरू आहे. ट्रम्प यांनी सप्टेंबर २००७ मध्ये सीएनएनला दिलेल्या मुलाखतीचा हवाला देत सांगितले की, ‘तेव्हा मी बोललेलो आठवून पाहा. मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी ठरत आहे, मग ती इराक-इराणबद्दल असेल किंवा चीन-भारत-जपानबद्दल असेल. आता आपल्या देशाकडे पाहा. आम्ही एक मोठी शक्ती होतो. संपूर्ण जगात आमचा आदर होता; परंतु आता आमची टर उडविली जाते. (वृत्तसंस्था)
भारताचे उत्तम सुरू आहे - ट्रम्प
By admin | Published: January 28, 2016 1:12 AM