कराची : चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरविरुद्ध (सीपीईसी) भारत अफगाणिस्तानचा वापर करून कटकारस्थाने करीत असल्याचा आरोप पाकिस्तानने केल्याचे ‘डॉन’ वृत्तपत्राने म्हटले. गृहमंत्री अहसान इक्बाल म्हणाले की, ५० अब्ज अमेरिकन डॉलरचा सीपीईसी प्रकल्प आर्थिकदृष्ट्या अपयशी ठरावा म्हणून ‘पाकिस्तानचे शत्रू’ वेगवेगळे डावपेच रचत आहेत. भारत कटकारस्थाने करीत असला तरी पाकिस्तान ते हाणून पाडील, असे इक्बाल गुरुवारी क्वेट्टामध्ये पासपोर्ट कार्यालयाच्या उद््घाटनानंतर म्हणाले.कटकारस्थानांसाठी भारत अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करीत आहे, असे सांगून ते म्हणाले की, सीपीईसी प्रकल्प यशस्वी होईल अशी आशा आहे. (वृत्तसंस्था)
सीपीईसीविरुद्ध भारताची कटकारस्थाने, पाकिस्तानचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 4:13 AM